Missing plane mystery | आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानाचे रहस्य उलगडणार!  File Photo
विश्वसंचार

Missing plane mystery | आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानाचे रहस्य उलगडणार!

पुढारी वृत्तसेवा

क्वालालंपूर : आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये मलेशियन एअरलाईन्सचे एक 239 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अचानक बेपत्ता झाले होते. आजपर्यंत या विमानाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या विमानाचे नेमके झाले काय? असा प्रश्न हा अनुत्तरित आहे. मात्र, या प्रश्नाची उकल होणार असून बेपत्ता विमानाचे रहस्य उलगडणार आहे. विमानाच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि गूढ रहस्य असलेल्या या विमानाचा शोध मलेशिया सरकारने पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूरहून बीजिंगकडे निघालेले बोईंग 777 हे मलेशियन एअरलाईन्सचे विमान उड्डाणानंतर काही तासांतच रडारवरून गायब झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शोधकार्य होऊनही विमानाचे अवशेष आजतागायत सापडलेले नाहीत. ही घटना आजही विमानन इतिहासातील सर्वात मोठे रहस्य मानली जाते. मलेशियाच्या परिवहन मंत्रालयाने जाहीर केले आहे की, 30 डिसेंबरपासून या विमानाचा शोध पुन्हा सुरू केला जाईल. या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या कुटुंबीयांना सांत्वना देणे आणि त्यांना उत्तर देणे, ही आमची जबाबदारी आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नवीन शोधमोहीम त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय समुद्री अन्वेषण संस्था ही शोधमोहीम हाती घेणार आहे. ही कंपनी पूर्वीच्या विश्लेषणांवर आधारित त्या विशिष्ट समुद्री भागात शोध घेईल, जिथे 370 च्या अवशेषांच्या सापडण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यावर्षी मार्चमध्येही शोधाला सुरुवात करण्यात आली होती; परंतु हवामान आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे काही दिवसांतच ती स्थगित करावी लागली होती. ही घटना आजही जगभरातील तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांसाठी एक मोठे कोडे आहे. आता पुन्हा सुरू होणार्‍या या मोहिमेतून काही ठोस पुरावे मिळतील आणि 8 वर्षांहून अधिक काळ असलेले हे गूढ अखेर उकलले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT