दुधाला का म्हणतात ‌‘पूर्णान्न‌’? 
विश्वसंचार

Milk Health Benefits : दुधाला का म्हणतात ‌‘पूर्णान्न‌’?

दुधात असतात शरीराला अत्यंत आवश्यक असणारे व्हिटॅमिन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः आपल्याकडे दुधाला ‌‘पूर्णान्न‌’ म्हणजेच संपूर्ण पोषण देणारे अन्न म्हटले जाते. दूध हे केवळ एक पेय नसून ते शरीरासाठी एक ‌‘सुपरफूड‌’ मानले जाते. लहान मुलांच्या वाढीपासून ते वृद्धांची हाडं मजबूत ठेवण्यात दुधाचा वाटा मोलाचा असतो. मात्र, तरीही काही लोकं दूध पिणं टाळतात. आज आपण दुधात कोणकोणते व्हिटॅमिन असतात, याची माहिती घेणार आहोत.

दुधामध्ये व्हिटॅमिन ए, डी, बी1, बी2, बी5 आणि बी12 यासारखी शरीराला अत्यंत आवश्यक व्हिटॅमिन असतात. दुधात हे सर्व व्हिटॅमिन नैसर्गिकरीत्या आढळतात. दुधातील हे घटक शरीराला केवळ ऊर्जाच देत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून संरक्षणही करतात. दुधातील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. हे जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच त्वचा सतेज व निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते; पण ते शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते. या जीवनसत्त्वामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. ज्यामुळे भविष्यात हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो. दुधामध्ये व्हिटॅमिन बी चा समावेश असतो. दुधातील व्हिटॅमिन बी 2 हे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते, ज्यामुळे थकवा दूर होतो. तसेच शरीर दिवसभर सक्रिय राहते. त्यासोबतच व्हिटॅमिन बी 12 मुळे हे जीवनसत्त्व मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अनिवार्य असते. तसेच दुधातील व्हिटॅमिन बी1 हे मेटाबॉलिझ्मची क्रिया सुधारून हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन बी 5 हे हार्मोन्सच्या निर्मितीत आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. जर तुम्ही दैनंदिन आहारात एक ग्लास दुधाचा समावेश केला, तर तुमच्या शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात. दुधाला एक नैसर्गिक ‌‘एनर्जी ड्रिंक‌’ म्हटले जाते. हे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT