Meteor hits house Germany | जर्मनीत घराचे छप्पर फोडून कोसळली उल्का 
विश्वसंचार

Meteor hits house Germany | जर्मनीत घराचे छप्पर फोडून कोसळली उल्का

पुढारी वृत्तसेवा

कोब्लेंझ (जर्मनी) : युरोपमधील अनेक देशांमध्ये एक थरारक ‘फायरबॉल’ (धगधगता अग्निगोळ) दिसल्यानंतर, जर्मनीतील कोब्लेंझ-गुल्स शहरात एका उल्केने घराचे छप्पर फोडून मोठे नुकसान केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि कुतूहलाचे वातावरण पसरले आहे.

8 मार्च रोजी एका उल्केने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. वातावरणातील घर्षणामुळे या उल्केचा मोठा स्फोट होऊन आकाशात प्रचंड प्रकाश निर्माण झाला आणि तिचे तुकडे जमिनीच्या दिशेने विखुरले गेले. यापैकी एक तुकडा थेट एका घराच्या छताला छिद्र पाडून बेडरूममध्ये पडला. युरोपच्या ‘AllSky7’ या फायरबॉल नेटवर्कने या उल्केचा थरारक प्रवास आपल्या कॅमेर्‍यात कैद केला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6.55 वाजता जर्मनीच्या राइनलँड-पॅलाटिनेट भागात ही घटना घडली. हा स्फोट साधारण सहा सेकंद सुरू होता.

‘इंटरनॅशनल मेटियर ऑर्गनायझेशन’ (IMO) नुसार, स्फोट होण्यापूर्वी या उल्केचा व्यास अनेक मीटर असावा, असा अंदाज आहे. केवळ जर्मनीच नव्हे, तर फ्रान्स, बेल्जियम आणि लक्झेंबर्गमधील 3,000 हून अधिक लोकांनी हा प्रकाश पाहिला आणि विमानाचा होतो तसा प्रचंड ‘सॉनिक बूम’ (आवाज) अनुभवला. स्फोटानंतर या उल्केचा धुराचा लोट आकाशात अनेक मिनिटे रेंगाळत होता. अवकाशातील मोठे खडक जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात वेगाने शिरतात, तेव्हा ते तापतात आणि त्यांचा स्फोट होतो. या घटनेत कोब्लेंझ-गुल्स शहरात पडलेले तुकडे इतके मोठे होते की, त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT