विश्वसंचार

मक्याच्या भुशापासून बनणार इलेक्ट्रोडची सामग्री

Pudhari News

हैदराबाद : आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी मक्याच्या भुशापासून सक्रिय कार्बन इलेक्ट्रोड सामग्री बनवण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा वापर हाय-व्होल्टेज सुपरकपॅसिटर बनवण्यासाठी होऊ शकतो. 

आयआयटी हैदराबाद तसेच तेथीलच इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (एआरसीआय) च्या संयुक्त अध्ययनात हे तंत्र विकसित करण्यात आले. मक्याचा भुसा आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडसारख्या घटकांच्या उपयोगातून सक्रिय कार्बन इलेक्ट्रोड बनवण्यात आले. सक्रिय कार्बन नमुन्यांच्या स्टोरेज क्षमतेचे मूल्यांकन करण्यावर या इलेक्ट्रोडमध्ये परंपरागत सुपरकपॅसिटर्सच्या तुलनेत सरस विद्युत रासायनिक क्षमता आणि उच्च ऊर्जा घनत्व दिसून आले. कार्बन आधारित इलेक्ट्रोड एनर्जी स्टोरेजशी निगडीत उपकरण बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्बन आधारित इलेक्ट्रोड हे सर्वसाधारणपणे महागड्या, उच्च शुद्धतेच्या घटकांपासून मिळवले जात असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT