Bird migration | एकाच वेळी कोट्यवधी पक्ष्यांचे स्थलांतर 
विश्वसंचार

Bird migration | एकाच वेळी कोट्यवधी पक्ष्यांचे स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क ः आकाशात एकाच वेळी कोटींमध्ये पक्षी दिसले तर काय होईल? तुम्ही आकाशात एकटक पाहात राहाल, नाही का? जगातील एका भागात असंच काहीसं चित्र दिसतं. येथे एकाच रात्रीत 37.3 कोटी स्थलांतरित पक्षी एकत्रित आकाशातून झेप घेतात. पक्ष्यांची ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तब्बल 35 कोटींहून अधिक आहे.

अमेरिकेचे कॉर्नेल लॅबच्या बर्डकास्टनुसार, 4 मे च्या सायंकाळी तब्बल 37.3 कोटी प्रवासी पक्षी उत्तरेकडे आपल्या प्रवास सुरू ठेवला. यामध्ये अधिकांश पक्षी अमेरिकेच्या दक्षिण आणि पूर्वेकडील तटावर दिसले. वन्यजीव तज्ज्ञ या पक्ष्यांना पाहू इच्छिणार्‍या सर्वांना नम—पणे विनंती करत आहेत की, त्यांनी या पक्षांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षी दोन मुख्य कारणांमुळे प्रवास करतात. अन्न आणि प्रजननासाठी ते जगभरात प्रवास करतात. सर्वसाधारणपणे, उन्हाळ्याच्या महिन्यांत पक्षी उत्तरेकडे प्रवास करतात. या काळात कीटक आणि नवीन वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

थंड हवामानात, थंडीपासून वाचण्यासाठी ते दक्षिणेकडे परत येतात; मात्र अनेक पक्षी बर्फाळ परिस्थितीतही तग धरतात. बर्डकास्ट संस्थेचे अभ्यासक पक्ष्यांची गणना कशी करतात हे पाहणेही रंजक आहे. मोजणीचं मॉडेल प्रामुख्याने राष्ट्रीय पर्यावरण पूर्वानुमान केंद्राचा डेटा आणि हवामान निरीक्षण रडारच्या वापराने केली जाते. हे 23 वर्षांच्या रडार वातावरणीय निरीक्षण माहितीवर आधारित आहे. वेगवेगळ्या हवामान परिस्थिती आणि स्थलांतराच्या निरीक्षणांमधील संभाव्य संबंधांचा अभ्यास केल्याने संशोधकांना कोणत्याही विशिष्ट दिवसासाठी अंदाज वर्तवण्यासाठी संगणकीय मॉडेल तयार करता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT