विश्वसंचार

‘मशाल’ बनण्याच्या प्रयत्नात भाजला रिल्स स्टार!

Arun Patil

उत्तर कॅरोलिना : ऑनलाईन चॅलेंजच्या नावाखाली अपघातांची संख्या कमी होण्याचे नावही घेत नाहीये. मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकाला तो कोणत्या ना कोणत्या दिवशी येणारच! पण याचा अर्थ असा नव्हे की, आपला जीव धोक्यात घालत फिरावे. आजकाल ऑनलाईन चॅलेंजने तर परिस्थिती आणखी बिघडवली असून एका रात्रीत स्टार होण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार असते, असे चित्र आहे. असेच काहीसे मॅसॉन डार्क या तरुणासोबत घडले असून, टिकटॉकवरील एक चॅलेंज घेण्याचा त्याला भलताच फटका बसला आहे.

या चॅलेंजमध्ये तरुण मुले स्वत:ला आगीच्या गोळ्याच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मॅसॉनने देखील हे जीवघेणे चॅलेंज स्वीकारले; पण यादरम्यान त्याच्याकडून काही गंभीर चुका झाल्या. यामुळे आग विझलीच नाही आणि गंभीर स्थितीत मॅसॉनला तातडीने हॉस्पितळात दाखल करावे लागले. या दुर्घटनेत मॅसॉनचे शरीर तब्बल 75 टक्के भाजून निघाले.

सदर रिल तयार करत असताना मॅसॉनला स्वत:ला ब्ल्यू टॉर्चमध्ये बदलायचे होते. यासाठी स्प्रे कॅन व लायटरचा उपयोग करायचा होता. पण, मॅसॉन त्यानंतर वेळीच आग विझवू शकला नाही आणि आता तो नाइलाजाने आयुष्याची लढाई लढत आहे. मॅसॉनला यातून वाचवता येईल का, याची डॉक्टरांनाही खात्री नाही. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT