Mars Gemstone Discovery | मंगळावर सापडले ‘माणिक’? नासाच्या पर्सिव्हेरन्स रोव्हरकडून रत्नांचा शोध! 
विश्वसंचार

Mars Gemstone Discovery | मंगळावर सापडले ‘माणिक’? नासाच्या पर्सिव्हेरन्स रोव्हरकडून रत्नांचा शोध!

पुढारी वृत्तसेवा

ह्युस्टन : लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळावर आता मौल्यवान रत्नांचा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नासाच्या ‘पर्सिव्हेरन्स’ रोव्हरने पाठवलेल्या माहितीनुसार, मंगळावरील खडकांमध्ये ‘माणिक’सारखे स्फटिक दडलेले असू शकतात. इतकेच नव्हे, तर खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहावर ‘नीलम’ सारखी इतर मौल्यवान खनिजेदेखील मोठ्या प्रमाणात असू शकतात.

टेक्सास येथे आयोजित 57 व्या ‘ल्युनार अँड प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्स’मध्ये संशोधकांनी हा अहवाल सादर केला. ही घटना मंगळावरील एका 4 अब्ज वर्षे जुन्या विवराच्या काठावर घडली. रोव्हरला फ्लोट रॉक्स येथे काही विचित्र फिक्कट रंगाचे खडक विखुरलेले दिसले. हे खडक मूळ ठिकाणचे नसून ज्वालामुखी किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे तिथे आले असावेत. रोव्हरच्या ‘सुपरकॅम’मधील हिरव्या लेझरने या खडकांवर मारा केला. लेझरच्या प्रकाशामुळे खडकातील खनिजे उत्तेजित होऊन विशिष्ट रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात, ज्यावरून त्यांच्या रासायनिक रचनेचा उलगडा होतो. लेझर विश्लेषणातून असे दिसून आले की, तीन खडकांमध्ये ‘कोरंडम’ नावाच्या खनिजाचे अंश आहेत, ज्यात ‘क्रोमियम’चे मिश्रण आहे.

ही रासायनिक रचना हुबेहूब ‘माणिक’ या रत्नाशी जुळते. मात्र, वैज्ञानिकांनी अद्याप याला अधिकृतपणे ‘माणिक’ घोषित केलेले नाही. युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा येथील प्लॅनेटरी जिओलॉजिस्ट व्हॅलेरी पेरे यांनी सांगितले, ‘कोरंडमचे विविध प्रकार त्याच्या रासायनिक रचनेवर अवलंबून असतात. जरी याचे मुख्य Al2? O3? (अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईड) असले, तरी त्यात क्रोमियम, टायटॅनियम किंवा लोह यांसारख्या मूलद्रव्यांचे अल्प प्रमाण असू शकते.’ हे स्फटिक इतके सूक्ष्म आहेत की, रोव्हरच्या कॅमेर्‍याने ते स्पष्टपणे टिपता आलेले नाहीत. त्यामुळे हे नक्की ‘मार्टियन रुबी’ (मंगळावरील माणिक) आहेत की, कोरंडमचा दुसरा एखादा प्रकार, याचा सखोल अभ्यास सध्या सुरू आहे. हे संशोधन लवकरच ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT