न्यूयॉर्क : आलिशान, विलासी जीवन असावे, असे अनेकांचे स्वप्न असते आणि त्यात काही गैरही नाही. पण, न्यूयॉर्कमधील मँडर्स बॅनेट या महिलेने मात्र सर्वसाधारण जीवनशैलीचा कंटाळा आल्याने घरदार सोडून चक्क जंगलात वास्तव्य केले आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, अवघ्या 32 वर्षांची ही महिला मॉडर्न लाईफला कंटाळली होती आणि त्यानंतर तिने चक्क जंगलात बस्तान करण्याचा अचाट, धाडसी निर्णय घेतला. जुलै 2019 मध्ये घरी पाळलेल्या घोड्यावर बसून तिने जंगल गाठले आणि मागील 4 वर्षांपासून ती जंगलात इकडेतिकडे फिरत राहत आली आहे. जंगलात मिळेल ते खाऊन ती राहत आली आहे.
आतापर्यंत इडाहो ते ऑर्गन या 500 मैल टप्यात तिने बराच प्रवास केला. काही अन्न पदार्थ शिजवून घ्यायचे असेल, तर ती तेथेच चूल मांडते आणि त्यावरच ती अवलंबून राहत आली आहे. जंगलात राहिली असली तरी ती सोलर बॅटरीवर आपला फोन चार्ज करते. झर्याचे पाणी असल्याने पाण्याचाही प्रश्न मिटला असल्याचे ती सांगते.