‘चॅटजीपीटी’वर रचला आई, भावाच्या हत्येचा कट 
विश्वसंचार

America Crime : ‘चॅटजीपीटी’वर रचला आई, भावाच्या हत्येचा कट

सरकारी वकिलांच्या माहितीने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

बोस्टन / मॅसॅच्युसेटस्‌ : अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस्‌ राज्यात एका १७ वर्षीय मूळच्या भारतीय वंशाच्या मुलाने स्वतःची आई आणि लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन अरविंद असे या आरोपी मुलाचे नाव असून, हत्येपूर्वी त्याने ‘चॅटजीपीटी’ या कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉटवर कुटुंबाच्या हत्येबाबतच्या काल्पनिक कथा आणि सिद्धांतांचा शोध घेतला होता, अशी धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

बोस्टनजवळील अ‍ॅक्टन येथील घरात सुधा व्यंकटेशन (वय ४५) आणि त्यांचा १४ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ अरविंद यांचे मृतदेह मंगळवारी आढळून आले. अर्जुनने न्यायालयात स्वतःला निर्दोष जाहीर केले असून, त्याच्यावर दुहेरी हत्येसह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी रक्ताने माखलेला, तुटलेला लॅपटॉप आणि वाकलेला चाकू सापडला आहे.

मिडलसेक्स काऊंटीच्या जिल्हा अ‍ॅटर्नी मारियन रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद वर्तन करत होता. त्याने चॅटजीपीटीवर गॉथिक पद्धतीच्या काल्पनिक कथा, संशयास्पद प्रश्न आणि कुटुंबाच्या जीवाशी संबंधित धोक्यांबाबत चॅटिंग केले होते. अर्जुनच्या मानसिक त्रासामुळे कुटुंबीयांनी आधीच घरातील चाकू लपवून ठेवले होते, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

घरी शिकवणीसाठी आलेले शिक्षक आत जाऊ न शकल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी वेसलँड येथील एका पार्किंग लॉटमधून अर्जुनला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची जामीन नाकारत मानसिक चाचणीचे आदेश दिले आहेत. या हत्याकांडामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा जगभरात गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT