Man drinks engine oil | चक्क इंजिन ऑईल पिऊन राहणारा माणूस! Pudhari File Photo
विश्वसंचार

Man drinks engine oil | चक्क इंजिन ऑईल पिऊन राहणारा माणूस!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पृथ्वीच्या पाठीवर अनोख्या लोकांची अजिबात कमतरता नाही. असाच एक माणूस कर्नाटकात आहे. तो दिवसभराची भूक एका अनपेक्षित गोष्टीने भागवत आहे. सहसा सामान्य व्यक्ती भूक लागल्यास विविध अन्नपदार्थांच्या सेवनास प्राधान्य देतात, इथं मात्र ही व्यक्ती अन्न नव्हे, तर चक्क टाकाऊ (वेस्ट) ‘इंजिन ऑईल’ पिऊन भूक भागवत आहे. यावर कुणाचा विश्वास न बसणं अगदी स्वाभाविक आहे; पण हे खरंय. एका इन्स्टाग्राम पोस्टमुळं ही व्यक्ती आणि कैक वर्षांपासूनची त्यांची सवय उजेडात आली. जिथं ही व्यक्ती तीस वर्षांपासून इंजिन ऑईल पित असल्याचं म्हटलं जात आहे.

इंजिन ऑईल पिण्याच्या या सवयीमुळं ही व्यक्ती कर्नाटकातील शिवमोंगा जिल्ह्यामध्ये एका अनोख्या नावानं ओळखली जाते. हे नाव म्हणजे, ‘ऑईल कुमार’. इन्स्टाग्राम पोस्टच्या माहितीनुसार एका दिवसात हा माणूस साधारण सात ते आठ लिटर इंजिन ऑईल फस्त करतो. चहावरसुद्धा त्यांचा भर असतो. अन्नपाण्याऐवजी हा माणूस चहा आणि इंजिन ऑईल पिऊन राहतो.

चहा पिण्यार्यंत ठीक, मात्र त्यांच्या ऑईल पिण्याच्या सवयीला अतिशय घातक म्हटलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लोकांनी अन्नपदार्थ देऊनही कुमार ते नाकारत आहेत. त्याऐवजी ते एका बाटलीत भरलेलं इंजिन ऑईल पिण्यावर भर देत आहेत. आपण अय्यप्पा स्वामी या देवाचे भक्त असल्याचे तो सांगतो. त्यांच्या कृपेने आपल्याला काही त्रास होत नाही व दवाखान्यात न जाता निरोगी आयुष्य जगता येते असा या व्यक्तीचा दावा आहे. इंजिन ऑईल हा एक पेट्रोलियम घटक असणारा मानवी शरीरास अतिशय घातक असा पदार्थ आहे. डॉक्टरही इंजिन ऑईल न गिळण्याचा सल्ला देतात. त्याच्या सेवनामुळं फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. मात्र, तरीही कर्नाटकातील हा माणूस कसं काय हे सारं निभावून नेत आहे, हाच प्रश्न त्यांना पाहणार्‍यांच्या मनात घर करतोय!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT