नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक नाग थेट फ्रिजच्या आत बसलेला दिसतोय! उन्हाच्या झळांपासून आराम मिळावा म्हणून फक्त माणसंच नाही, तर आता प्राणीही थंड जागांचा शोध घेताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये नाग दरवाजातील कप्प्यात आपला फणा पसरवत आरामात बसलेला दिसतो. ज्या क्षणी कुणीतरी फ्रिज उघडलं, तेव्हा घरच्यांची एकदम धांदल उडाली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की तो कदाचित एखादा खेळण्याचा साप असेल, पण त्याची किंचितशी हालचाल पाहून सगळ्यांचं धाबं दणाणलं. ही घटना सांगते की, तप्त उन्हाळा प्राण्यांनाही अस्वस्थ करून टाकतोय. कदाचित हा नाग घरात उघड्या खिडकी किंवा दरवाजातून शिरला असावा आणि फ्रिजच्या सीलिंगमधून आत घुसला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते.
विशेषज्ञ सांगतात की, सरीसृप प्रजातीचे प्राणी आपले शरीर उष्णतेपासून वाचवण्यासाठी थंड जागा शोधत असतात उदा. सावली, खड्डे किंवा आता थेट फ्रिजसुद्धा! हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. काहीजण आश्चर्यचकित आहेत की नाग फ्रिजमध्ये पोहोचला तरी कसा, तर काहीजण याला तीव्र उष्णतेचं परिणाम मानत आहेत. एका युजरने मजेशीर कमेंट केली, ‘आता फ्रिज उघडण्यापूर्वीही विचार करावा लागेल!’ तर दुसर्याने लिहिलं, ‘साप पण आता स्मार्ट झालाय, एसी नाही मिळाला तर फ्रिजचं ठिकाण बेस्ट!’