Bone Cancer Treatment | हाडांच्या कर्करोगावर प्रभावी ‘मॅग्नेटिक नॅनोमटेरिअल’ Pudhari File Photo
विश्वसंचार

Bone Cancer Treatment | हाडांच्या कर्करोगावर प्रभावी ‘मॅग्नेटिक नॅनोमटेरिअल’

कर्करोगाच्या पेशी नष्ट करते कमकुवत हाडांना मजबुती देते

पुढारी वृत्तसेवा

ब्राझीलिया : ब्राझील आणि पोर्तुगालच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे एका अशा विशेष ‘मॅग्नेटिक नॅनोमटेरिअल’ चा शोध लावला आहे, जे हाडांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी क्रांती घडवू शकते. हे नवीन तंत्रज्ञान एकाच वेळी दोन महत्त्वाची कामे करते. पहिले म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे आणि दुसरे म्हणजे कमकुवत झालेल्या हाडाला पुन्हा मजबुती मिळवून देणे.

शास्त्रज्ञांनी लोहाच्या ऑक्साईडपासून बनवलेले अत्यंत सूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल्स) तयार केले आहेत. या कणांवर ‘बायोअ‍ॅक्टिव्ह ग्लास’चा एक अतिशय पातळ थर चढवण्यात आला आहे. या मटेरियलचा आतील भाग चुंबकीय आहे, तर बाहेरील थर हाडांशी घट्ट चिकटण्यास मदत करतो. ही अनोखी रचनाच या संशोधनाला विशेष बनवते. संशोधकांनी या नॅनोमटेरिअलची चाचणी शरीरातील द्रवासारख्या कृत्रिम द्रावणात केली. यावेळी असे दिसून आले की, हे मटेरियल अतिशय वेगाने ‘एपाटाईट’ नावाचे खनिज तयार करते. हे तेच खनिज आहे जे आपल्या शरीरातील हाडांचा मुख्य घटक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT