‘या’ फळांमुळे फुफ्फुसांचे आरोग्य राहते चांगले. Pudhari File Photo
विश्वसंचार

‘या’ फळांमुळे फुफ्फुसांचे आरोग्य राहते चांगले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ खावेत, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामध्ये काही फळांचाही समावेश होतो, जी फुफ्फुसांना नवीन जीवन देऊ शकतात. या फळांच्या सेवनाने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामध्ये सफरचंदांपासून ते ब्लॅकबेरीपर्यंत अनेक प्रकारच्या फळांचा समावेश होतो.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी फळे

सफरचंदांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस् भरपूर असतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारू शकते. फायटोन्यूट्रिएंट्स समृद्ध सफरचंद फुफ्फुसातील संसर्ग कमी करण्यास मदत करू शकतात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते. अननसही फुफ्फुसांसाठी फायदेशीर मानले जाते. अननसात ब्राेमेलेन नावाचे एंजाइम असते, जे श्वसन प्रणाली सुधारू शकते. हे फुफ्फुसाचा संसर्ग आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. अननसात व्हिटॅमिन ‘सी’ आणि इतर पोषक घटक देखील असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. अननसाचे सेवन केल्याने श्लेष्मा कमी होतो आणि श्वास घेणे सोपे होते. त्यामुळे तुमच्या आहारात अननसाचा सामावेश करा. संत्र्याचाही शरीराला चांगला लाभ होतो. संत्री व्हिटॅमिन ‘सी’चा उत्कृष्ट स्रोत आहे, जो फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संत्र्यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात, जे फुफ्फुसातील जळजळ कमी करतात आणि त्यांचे कार्य सुधारतात. संत्र्यांचे नियमित सेवन केल्याने फुफ्फुसे तर निरोगी राहतातच शिवाय श्वसनासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो. ब्लॅकबेरीही फुफ्फुसासाठी चांगला उपाय मानली जाऊ शकतात. जांभळेही फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंटस्चा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये अनेक नैसर्गिक संयुगे असतात, ज्यामुळे फुफ्फुस मजबूत होण्यास मदत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT