वृद्धावस्थेत अनेक पुरुषांमधील ‌‘वाय‌’ गुणसूत्राचा होतो ऱ्हास 
विश्वसंचार

Health Research : वृद्धावस्थेत अनेक पुरुषांमधील ‌‘वाय‌’ गुणसूत्राचा होतो ऱ्हास

गंभीर आजारांना निमंत्रण; नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन ः पुरुषांच्या उतार वयानुसार त्यांच्या पेशींमधून ‌‘वाय‌’ क्रोमोझोम (गुणसूत्र) नष्ट होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांना वाटत होते की, ‌‘वाय‌’ गुणसूत्राचा संबंध केवळ लिंग निश्चितीशी असल्याने तो नष्ट झाल्यामुळे आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. मात्र, ताज्या संशोधनाने हा समज मोडीत काढला असून, हा बदल गंभीर आजारांना आणि अकाली मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो, असे दिसून आले आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या तपासणीत असे आढळले आहे की, वृद्ध पुरुषांच्या ऊतींमध्ये ‌‘वाय‌’ गुणसूत्र झपाट्याने कमी होत आहेत. 60 वर्षे वयाच्या पुरुषांपैकी 40 टक्के लोकांमध्ये हा ऱ्हास दिसून आला. 90 वर्षे वयाच्या पुरुषांमध्ये हे प्रमाण 57 टक्क्यांपर्यंत पोहोचते. धूमपान आणि कर्करोगजनक घटकांच्या संपर्कात येण्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होते. संशोधनानुसार, ज्या पुरुषांच्या पेशींमधून ‌‘वाय‌’ गुणसूत्र नष्ट झाले आहे, त्यांना अनेक आजारांचा धोका अधिक असतो. जर्मनीमधील एका मोठ्या अभ्यासानुसार, 60 वर्षांवरील पुरुषांमध्ये ‌‘वाय‌’ गुणसूत्र कमी असल्यास हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. अल्झायमरच्या रुग्णांमध्ये ‌‘वाय‌’ गुणसूत्राचा ऱ्हास होण्याचे प्रमाण 10 पटीने जास्त असल्याचे आढळले आहे. कर्करोगच्या पेशींमध्ये हा बदल प्रामुख्याने दिसतो आणि अशा रुग्णांच्या उपचारांना मिळणारा प्रतिसादही कमी असतो. कोरोनाकाळात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असण्यामागे ‌‘वाय‌’ गुणसूत्राचा अभाव हे एक कारण असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT