अधिक वेळ काम केल्याने बदलू शकते मेंदूची संरचना Pudhari File Photo
विश्वसंचार

अधिक वेळ काम केल्याने बदलू शकते मेंदूची संरचना

ऑक्युपेशनल अँड एन्व्हायरनमेंटल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित

पुढारी वृत्तसेवा

सेऊल : जास्त वेळ काम केल्याने आपल्या मेंदूची रचना बदलू शकते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. ऑक्युपेशनल अँड एन्व्हायरनमेंटल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जे लोक जास्त काम करत होते, त्यांच्या मेंदूत व्यापक बदल झाल्याचे आढळून आले. हे संशोधन दक्षिण कोरियामधील चुंग-आंग विद्यापीठ आणि योनसेई विद्यापीठाच्या दोन वैज्ञानिकांनी केले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांच्या विशिष्ट क्षेत्रांवर जास्त कामाचा काय परिणाम होतो, हे पाहिले गेले, जे नियमितपणे आठवड्यातून 52 तासांपेक्षा जास्त काम करतात. अंतिम विश्लेषणात सुमारे 110 कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला. यापैकी 32 जणांनी जास्त तास काम केले आणि 78 जणांनी सर्वसाधारण तास काम केले.

अभ्यासात असे आढळून आले की, जास्त काम केल्याने मेंदूचा तो भाग प्रभावित होऊ शकतो, जो समस्या सोडवणे आणि स्मरणशक्तीशी संबंधित आहे, तसेच मानसिक स्वास्थावरही परिणाम होतो, असे ‘सीएनएन’ने म्हटले आहे. संशोधकांनी मेंदूच्या संरचनेची तपासणी करण्यासाठी एमआरआय स्कॅनसह डेटा वापरला. या तंत्रामुळे त्यांना मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रे मॅटरच्या पातळीतील फरक ओळखता आले आणि त्यांची तुलना करता आली. संशोधकांनी आपल्या अभ्यासात असेही म्हटले आहे की, ‘ज्या लोकांनी आठवड्यातून 52 किंवा त्याहून अधिक तास काम केले त्यांच्या मेंदूच्या कार्य आणि भावनिक नियमनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून आले, तर मानक तास काम करणार्‍या सहभागींमध्ये असे दिसून आले नाही.’

अभ्यासाच्या लेखकांनी असे निदर्शनास आणले की, मेंदूचा नियोजन आणि निर्णय घेणारा भाग प्रभावित झाला होता. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या निष्कर्षांवरून कामाचा वाढता ताण आणि मेंदूच्या या भागांमध्ये होणारे बदल यांच्यातील ‘संभाव्य संबंध’ दिसून येतो.

स्काय न्यूजच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य संस्थेतील धोरण आणि सार्वजनिक व्यवहार प्रमुख रूथ विल्किन्सन म्हणाल्या की ‘दीर्घकाळ काम करण्याच्या महामारी’ ला सामोरे जाण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT