विश्वसंचार

शब्दांपासून व्हिडीओ बनवणारे ‘एआय सोरा’ टूल लाँच

Arun Patil

न्यूयॉर्क : सध्या 'एआय'च्या मदतीने कोणत्या करामती करता येतील, हे सांगता येणे कठीण झाले आहे, इतकी 'एआय'ची मोठी व्याप्ती आहे. 'एआय' म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी म्हणजे 'ओपन एआय.' याच कंपनीच्या 'चॅट जीपीटी'ने जगाला थक्क केले होते. आता या कंपनीने आपले नवे 'एआय' टूल 'सोरा' लाँच केले आहे. सोरा मॉडेल हे लिखित शब्दांच्या मदतीने एक मिनिटाचे हाय-डेफिनेशन व्हिडीओ तयार करू शकते.

कंपनीने म्हटले आहे की, सोरा अनेक वर्ण, विशिष्ट प्रकारची गती, विषयाचे अचूक तपशील आणि पार्श्वभूमी असलेले गुंतागुंतीचे व्हिडीओ तयार करण्यास सक्षम आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही हे सोरा टूल गुगल आणि मेटा यांनी बनवलेल्या टूल्सपेक्षा सरस असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'सोरा'च्या मदतीने तुम्ही फक्त मजकूर स्वरूपात प्रश्न विचारून एक मिनिटाचा हाय-डेफिनेशन व्हिडीओ तयार करू शकता.

कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी याबाबतची माहिती 'एक्स'वरून दिली आहे. त्यांनी सोराच्या मदतीने बनवलेली व्हिडीओ क्लिपही शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, सोरा हे टूल संशोधनाच्या टप्प्यात असून, लवकरच ते सर्वांच्या वापरासाठी खुले होईल. आज आम्ही रेट-टायमिंग सादर करीत आहोत आणि मर्यादित संख्येच्या निर्मात्यांना प्रवेश देत आहोत. 'एआय सोरा' हे टेक्स्ट-टू-व्हिडीओ जनरेटर एआय टूल आहे. सोप्या शब्दात सांगायचे, तर ते लिखित कथा आणि कवितांचेही व्हिडीओमध्ये रूपांतर करू शकते!

SCROLL FOR NEXT