विश्वसंचार

जगातील सर्वात मोठा देश

Arun Patil

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा देश कोणता, असे विचारल्यावर अनेक लोक गोंधळात पडतात. त्यांना याचे उत्तर क्षेत्रफळाच्या आधारे द्यावे की लोकसंख्येच्या हे कळत नाही. अनेक वेळा ज्या देशाचे क्षेत्रफळ अधिक असते तेथील लोकसंख्या कमी असते. तसेच अनेक वेळा अधिक लोकसंख्या असलेला देश क्षेत्रफळाबाबत लहान असतो. क्षेत्रफळाचा विचार करता जगातील सर्वात मोठा देश म्हणजे रशिया. पृथ्वीच्या एकूण भूभागाचा अकरा टक्के हिस्सा याच देशाने व्यापलेला आहे.

क्षेत्रफळाचा विचार करता जगातील सर्वात मोठे देश असे ः रशिया, कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, अर्जेंटिना, कझाकिस्तान आणि अल्जेरिया. 'सायन्स फोकस'मध्ये प्रकाशित माहितीनुसार क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 1,70,98,242 चौरस किलोमीटर आहे. हा देश कॅनडापेक्षा जवळजवळ दुपटीने मोठा आहे. पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे अकरा टक्के भाग रशियाचाच आहे.

अर्थात पर्माफ्रॉस्टमुळे रशियाचा 60 टक्क्यांपेक्षाही अधिक भाग राहण्यास योग्य नाही. रशिया इतका मोठा देश आहे की, तो युरोपच्या ईशान्य भागापासून उत्तर आशियापर्यंत फैलावलेला आहे. विशेष म्हणजे रशिया अकरा 'टाईम झोन'मध्ये विभागलेला आहे. रशियात एकाच वेळी निम्म्या भागात दिवस असतो तर निम्म्या भागात रात्र असते. हा खेळ एक-दोन दिवस नव्हे तर अडीच महिने चालतो. मॉस्को हे देशातील सर्वात मोठे शहर आहे.

SCROLL FOR NEXT