Wasp Spider | यूकेतील मोठी ‘वास्प स्पायडर’ वेस्ट मिडलँडस्‌मध्ये दाखल 
विश्वसंचार

Wasp Spider | यूकेतील मोठी ‘वास्प स्पायडर’ वेस्ट मिडलँडस्‌मध्ये दाखल

पुढारी वृत्तसेवा

वेस्ट मिडलँडस्‌ : युनायटेड किंगडममधील कोळ्यांच्या सर्वात मोठ्या प्रजातींपैकी एक असलेला ‘वास्प स्पायडर’ आता वेस्ट मिडलँडस्‌ क्षेत्रात आढळून आला आहे. वाढत्या तापमानामुळे या कोळ्याचा अधिवास त्याच्या मूळ ठिकाणापासून १०० मैलांपेक्षा जास्त उत्तरेकडे सरकला आहे.

आपल्या अंगावरील पिवळ्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या वैशिष्ट्यपूर्ण पट्ट्यांमुळे ओळखला जाणारा हा कोळी सहसा दक्षिण इंग्लंडमध्ये आढळतो. मात्र, गेल्या काही वर्षांत तो अधिक उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणावर नोंदीत झाला आहे. आपल्या नावातील ‘वास्प’प्रमाणे हा कोळी उडू शकत नाही. परंतु, या प्रजातीची छोटी पिल्ले वाऱ्याच्या प्रवाहाच्या मदतीने रेशमी धाग्यांवर तरंगत लांबचा प्रवास करतात. या तंत्राला वैज्ञानिक भाषेत ‘बलूनिंग’ म्हटले जाते. ‘वरसेस्टरशायर वाईल्डलाईफ ट्रस्ट’नुसार, हा कोळी अलीकडेच वरसेस्टरशायरसह हर्टफोर्डशायर आणि वॉरविकशायर भागांतही दिसून आला आहे. ट्रस्टच्या वेंडी कार्टर यांनी नागरिकांना या कोळ्याच्या आकाराला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. ‘हे कोळी आकाराने मोठे असल्याने भीतीदायक वाटतात, हे मला माहीत आहे. परंतु, हे अत्यंत अद्‌भुत जीव आहेत आणि ते मानवाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात वेंडी कार्टर आणि त्यांच्या पतीने एकिंग्टनजवळ या कोळ्याची नोंद केली असून, संपूर्ण प्रांतातून अशा अनेक नोंदी समोर येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT