इंग्लंडमध्ये अपघातानेच कोट्यवधी वर्षांपूर्वीचा डायनासोर्सचा येण्या-जाण्याचा मार्ग सापडला.  Pudhari File Photo
विश्वसंचार

इंग्लंडमध्ये सापडला डायनासोरचा ‘हायवे’!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : इंग्लंडमध्ये काही मजुरांना अपघातानेच कोट्यवधी वर्षांपूर्वीचा डायनासोर्सचा येण्या-जाण्याचा मार्ग सापडला आहे. 201.3 दशलक्ष ते 145 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या ‘ज्युरासिक’ काळातील हा मार्ग आहे. डेवार्स फार्म क्युरी येथे हा लांब मानेच्या व अवाढव्य डायनासोरचा ‘हायवे’ आढळून आला. ही आता इंग्लंडमधील डायनासोरच्या पाऊलखुणा असलेली सर्वात मोठी साईट ठरली आहे.

यापैकी एक मार्ग हा तीस फूट लांबीच्या मेगालोसॉरसचा आहे. हा सर्वात मोठ्या आकाराचा मांसाहारी डायनासोर होता. अन्य दोन मार्ग हे महाकाय अशा सॉरोपॉडस्, विशेषतः सेटीओसॉरसचा आहे. हे सॉरोपॉड्स 60 फूट लांबीचे होते. बिर्मिंघम युनिव्हर्सिटीतील किर्स्टी एडगर यांनी याबाबतची माहिती दिली. इंग्लंडमधील दक्षिणेकडे असणार्‍या एका चुनखडकाच्या खाणीमध्ये मातीत खोदकाम करताना एका मजुराला अचानकच अनपेक्षित उंचवटे जाणवू लागले आणि याच एका शंकेनं जगासमोर आला ‘डायनासोर हायवे’. डायनासोरच्या वावरण्याचे साधारण 200 मार्ग इथं उत्खननातून समोर आले आणि हे सर्व अवशेष 166 मिलियन वर्षांपूर्वीचे अर्थात 16 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास 100 हून अधिक पुरातत्त्व विभाग कर्मचार्‍यांनी या भागामध्ये खोदकाम करत हे अवशेष शोधून काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT