विश्वसंचार

किवी फळात असतात अनेक आरोग्यदायी गुण

Arun Patil

नवी दिल्ली : सध्या नेहमीच्या फळांबरोबरच अनेक 'नवी' फळेही आपल्या आहारात रुळत आहेत. त्यामध्ये किवी आणि ड्रॅगन फ्रूटचा समावेश होतो. किवी हे फळ सकृतदर्शनी चिकूसारखे दिसते; पण त्याची आंबट-गोड चव अधिक लक्षात राहते. हे फळ केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही गुणकारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तसे पाहता फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीरच असतात. पोषक तत्त्वांनी युक्त अशी अनेक फळे आपले आरोग्य सुधारतात. काही फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. किवी हे या फळांपैकी एक आहे. किवीच्या चवीमध्ये गोड-आंबट यांचे मिश्रण आहे, त्यामुळेच अनेकांना ते आवडते. किवीमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल भरपूर असतात. त्यात कमी कॅलरी सामग्री आहे, म्हणून तुम्ही त्याचा 'अमृत फळ' म्हणून विचार करू शकता. हे फळ खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल आणि तुमचे वजनही वाढणार नाही.

डोळ्यांशी संबंधित आजारांमध्ये किवी खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने डोळ्यांची द़ृष्टी सुधारते आणि अंधुकपणाची समस्याही दूर होण्यास मदत होते. किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. हे फळ खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. तुमची प्रतिकारकशक्ती वाढवायची असेल, तर तुम्ही किवी जरूर खा. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर
प्रमाणात असते. किवी खाल्ल्याने हृदय चांगले राहते. त्यामध्ये असलेले

फायबर आणि पोटॅशियम खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करताय. हे फळ धमन्या मजबूत करण्याचेही काम करते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.

SCROLL FOR NEXT