Kerala AI Kid | केरळचा ‘एआय कीड’ आणि पुतिन यांचा संवाद...!  
विश्वसंचार

Kerala AI Kid | केरळचा ‘एआय कीड’ आणि पुतिन यांचा संवाद...!

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को : येथे आयोजित एआय परिषदेदरम्यान केरळचा १७ वर्षीय राऊल जॉन अजू आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात रंजक चर्चा झाली. एआय मुलांच्या आवडीनिवडीनुसार शिक्षणाला आकार देऊ शकते, असा युक्तिवाद अजू याने मांडला, तर एआयवरील अतिअवलंबित्वाबाबत पुतिन यांनी चिंता व्यक्त केली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, ते जाणून घेऊया...

भारताचा ‘एआय कीड’ म्हणून ओळखला जाणारा १७ वर्षीय उद्योजक राऊल जॉन अजू याने मॉस्कोमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिषदेत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला. संवादादरम्यान अजूने सांगितले की, एआयच्या मदतीने शिक्षण मुलांच्या आवडी आणि शिकण्याच्या पद्धतीनुसार तयार करता येऊ शकते. गणिताचे उदाहरण देत तो म्हणाला, ‘कल्पना करा की माझ्यासारखा एक मुलगा आहे, ज्याला गणित आवडते. जर मी चित्रे, व्हिडीओ आणि अगदी खेळांच्या माध्यमातून गणित शिकू शकलो तर काय होईल? आणि तसेही, मी एआय देखील खेळांच्या माध्यमातूनच शिकलो आहे.’

अजूने सांगितले की, गणिताच्या परीक्षेच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांनी त्याला खेळ खेळताना पाहून प्रश्न विचारला होता. तो म्हणाला, ‘माझ्या गणिताच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी माझ्या वडिलांनी म्हटले की, तू खेळ कसा काय खेळतो आहेस? उद्या तुझी परीक्षा आहे.’ पण मी म्हणालो की मी अभ्यास करत आहे. त्यावर ते म्हणाले, ‘आजकालची मुले...’ अजू म्हणाला की, या अनुभवावरून त्याला जाणवले की शिकणे मजेदार आणि मुलाच्या स्वतःच्या गरजेनुसारही असू शकते. सारांश असा की मी मजेदार पद्धतीने शिकू शकत होतो, बरोबर ना? मी माझ्या पद्धतीने, माझ्या सोयीनुसार शिकू शकत होतो, पण ४० मुलांच्या वर्गात एक शिक्षक प्रत्येक मुलाच्या अभ्यासाला त्याच्यानुसार कसा सामावून घेऊ शकतो? आणि माझा असा विश्वास आहे की येथेच एआय मदत करू शकते.’ अजूच्या बोलण्याला उत्तर देताना पुतिन म्हणाले की, लोकांना केवळ माहिती लक्षात ठेवायला (पाठ करायला) नाही, तर विचार करायला शिकवले गेले पाहिजे.

तसेच त्यांनी लक्षात ठेवणे, शिकणे आणि तर्क करण्याची क्षमताही आवश्यक आहे. एआयचा मदतनीस (असिस्टंट) म्हणून वाढत्या वापराबाबत पुतिन यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, तंत्रज्ञानावर खूप जास्त अवलंबून राहिल्याने लोक स्वतः विचार करणे आणि तर्क करणे बंद करू शकतात. पुतिन यांच्या चिंतेला उत्तर देताना अजू म्हणाला की, एआयचा वापर मानवी विचारांची जागा घेणाऱ्या साधनाऐवजी एक सहकारी (कोलॅबोरेटर) म्हणून केला गेला पाहिजे. अजू म्हणाला, ‘मला वाटते की आपण एआयसोबत मिळून काम केले पाहिजे, त्याचा वापर आपल्या संपूर्ण विचारांची जागा घेण्यासाठी करू नये.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT