जगभरात अनेक गोष्टी सापडतील, ज्या अत्यंत विषारी आहेत. यामुळे मानवाचा जीवही जाण्याची शक्यता असते. आज आपण अशा काही झाडांविषयी माहिती जाणून घेणार आहोत, जे खूप विषारी आहेत. याच्या संपर्कात आल्यास क्षणात जीवही जाऊ शकतो.
सर्वांना एरंडेल बियांची माहिती असेलच, तेल बनवण्यासाठी या बिया वापरल्या जातात. हे तेल खूप फायदेशीर आहे. रिसिन नावाचे विष त्याच्या बियांमध्ये आढळते. यामुळे एखाद्या मुलाचा जीव देखील जाऊ शकतो.
वॉटर हेमलॉक ही सर्वात विषारी वनस्पती मानली जाते, ज्यामध्ये सिक्युटॉक्सिन नावाचे विष आढळते. हे चुकून मानवाच्या शरीरात गेल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते.
डेडली नाईटशेड या वनस्पतीमध्ये ट्रॉपिन आणि स्कोपोलामाईन नावाची विषारी रसायने असतात. यामुळे शरीराचा काही भाग निकामी होऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहावे.
ऑलिंडर वनस्पतीमध्ये कार्डियाक ग्लायकोसाइड्स आढळतात. ही वनस्पती जर कोणी ते खाल्ली तर उलट्या आणि जुलाब सुरू होतात आणि यामुळे मृत्यू देखील होतो.
रोझरी पीच्या बियांमध्ये एब्रिन नावाचे प्रथिन आढळते, जे अत्यंत घातक आहे. हे शरीरातील राइबोसोम्सचे कार्य थांबवते, ज्यामुळे शरीरातील पेशी मरायला लागतात. हे जीवघेणे ठरू शकते.
तंबाखूच्या वनस्पतीमध्ये अल्कलॉइड्स निकोटिन आणि अॅनाबासिन नावाचे विष आढळते. जे कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देते. यामुळे मृत्यूही होऊ शकतो.