मुंबई : पावसाळा सुरू होताच बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात. यामध्येच एका हिरव्या आणिर‘पिटुकल्या’ आकाराच्या रानभाजीचा समावेश होतो. तिला कर्टुले, कंटोळी किंवा रानकारली असेही म्हटले जाते. या रानकारली किंवा कर्टुलामध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फायबर, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम असे अनेक पोषक तत्त्व आढळतात. या भाजीमध्ये मांसाहारापेक्षा 50 टक्के जास्त प्रोटिन आढळतात, हे विशेष! जे लोक मांसाहार सेवन करत नाही त्यांच्यासाठी प्रोटिनची कमतरता भरून काढण्याठी कर्टुलाची भाजी फायदेशीर आहे. ही भाजी अनेक गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत करते.
कर्टुलाची भाजी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. कारण त्यात बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थन यासारखे विविध प्लेव्होनॉइड्स पुरेशा प्रमाणात असतात. हे फ्लेव्होनॉइड्स स्वच्छता एजंट म्हणून काम करतात. तसंच त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. जे त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी या भाजीचं सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. कर्टुल खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
याशिवाय त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने आतड्यांचे आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते. तसंच कार्टुलाच्या नियमित सेवनाने पचनक्रियादेखील सुरळीत होते. कर्टुलामध्ये असलेल्या पोटॅशियम आणि लोहामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. खरं तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि लोह हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. ज्यामुळे रक्ताभिसण सुधारते. तुम्ही कर्टुलाचा ज्यूस तयार करूनदेखील पिऊ शकता.
कर्टुलामधील व्हिटॅमिन सी आणि करोटीनॉइड्स रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतात. तसंच याच्या सेवनाने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. त्याचबरोबर त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होते. यातील ल्युटीन आणि बीट कॅरोटीन मॅक्युलर डीजनरेशनपासून बचाव करण्यास मदत करतात. कर्टुलामध्ये ल्युटीन पुरेशा प्रमाणात आढळते. जे कर्करोग रोखण्यास मदत करते. तसंच कर्टुला व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.