ट्रॅफिकचे नो टेन्शन, आता आलीय... ‘फ्लाईंग बाईक’ Pudhari File Photo
विश्वसंचार

ट्रॅफिकचे नो टेन्शन, आता आलीय... ‘फ्लाईंग बाईक’

पुढारी वृत्तसेवा

म्युनिक : जागतिक स्तरावर ऑटो क्षेत्राने एक नवी उंची गाठली असून, यावेळी अनेकांच्याच भुवया एका संशोधनामुळं उंचावल्या आहेत. हे संशोधन आहे चक्क हवेत उडणार्‍या बाईकचे! स्वप्नवत वाटणारी ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली असून, अखेर चर्चेत असणारी ‘फ्लाईंग बाईक’ समोर आली आहे.

जपानी स्टार्टअप कंपनी ऐरविन्स टेक्नॉलाजीजने नुकतीच ही पहिली हॉवरबाईक अमेरिकेत सुरू असणार्‍या ऑटो शोमध्ये सादर केली. पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाईक लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात येते,ज्यामुळे आता येत्या काळात वाहतूक कोंडीच्या समस्येवर कमाल तोडगा सापडला आहे, हे निश्चित जमेची बाजू म्हणजे ही बाईक बॅटरीवर चालणारी असून त्यामुळं इंधनाची चर्चासुद्धा मिटते. फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बाईकवर एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवास (उड्डाण) करता येते.

हॉवरबाईक तयार करणार्‍या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही बाईक 40 मिनिटांसाठी हवेत तरंगते. यादरम्यान ती ताशी 100 कि.मी. इतक्या वेगाने एक मोठे अंतर गाठण्याच्या क्षमतेने परिपूर्ण असते. महत्त्वाचे निकष अंदाजात घेत ही बाईक तयार करण्यात आली असून, ती पूर्णपणे कार्बन फायबरपासून तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही बाईक उडण्यासाठी त्यात छोटे आणि दोन मोठे रोटर बसवण्यात आले आहेत. जपानमध्ये या बाईकची विक्री सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक स्वरूपात ही बाईक ड्रोन तंत्रज्ञानावर काम करत असून त्यात आणि टेकऑफ आणि लँडिंगच्याही सुविधा आहेत. हॉवरबाईकची अमेरिकेत किंमत 7,77,000 डॉलर्स इतकी असेल. भारतीय चलनात ही रक्कम 6 कोटींच्या घरात येते. वर्षाअखेरपर्यंत या बाईकचे इतर छोटे युनिटही बाजारात आणले जाणार असून, त्यांची किंमत 50,000 डॉलर्सच्या घरात असू शकते. जपानच्या या कंपनीप्रमाणेच जगभरातील अनेक कंपन्या फ्लाईंग कार आणि बाईक्स बनवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT