Most Expensive Divorce | जपानमधील ‘हा’ प्रसिद्ध उद्योगपती पत्नीला ८,२०० कोटी देणार! 
विश्वसंचार

Most Expensive Divorce | जपानमधील ‘हा’ प्रसिद्ध उद्योगपती पत्नीला ८,२०० कोटी देणार!

सर्वात महागडा घटस्फोट

पुढारी वृत्तसेवा

सेऊल : दक्षिण कोरियाचे उद्योगपती आणि एसके ग्रुपचे चेयरमन चेय ताए-वोन यांचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आहे. सेऊल उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या तडजोडीची रक्कम कमी केली असली तरी, त्याला त्याची एक्स पत्नी रो सोह-योंग हिला अंदाजे ९४४ अब्ज वॉन (अंदाजे ९४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) किंवा भारतीय चलनात अंदाजे ८,२०० कोटी (८२ अब्ज वॉन) द्यावे लागतील. अद्याप हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं नाही. दोन्ही पक्षांपैकी कोणाचीही इच्छा असल्यास ते दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात.

न्यायालयाने सांगितलं की, लग्नादरम्यान चेय ताए-वोनची व्यावसायिक भागीदारी आणि संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे त्यांची एक्स पत्नी रो सोह-योंग कुटुंब, मुलांचा योग्य पद्धतीने सांभाळ करीत आहे. याच्या आधारावर उद्योगपतीला त्याच्या संपत्तीचा एक मोठा भाग पत्नीला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. चेय ताए-वोन दक्षिण कोरियातील एक मोठे उद्योगपती आणि SK Group चे चेयरमन आहेत. त्यांची कंपनी SK Hynix ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये वाढत्या मागणीमुळे फायदा झाला आहे. त्यांची एकूण भागीदारी तब्बल ५.५ बिलियन डॉलरच्या घरात आहे. त्यांचे लग्न १९८८ मध्ये झालं होतं आणि त्यांना तीन मुलंही आहेत. २०१७ मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर हा कायदेशीर वाद न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट'चे बिल व मेलिंडा गेटस्‌ तसेच ‘ॲमेझॉन'चे जेफ बेजोस व मॅकेंझी स्कॉट यांचे घटस्फोट चर्चेत आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT