‘जेम्स वेब’ कडून बारा अनोख्या नवजात तार्‍यांचा शोध James Webb Telescope
विश्वसंचार

‘जेम्स वेब’ कडून बारा अनोख्या नवजात तार्‍यांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने डझनभर नवजात तार्‍यांचा शोध लावला आहे. या तार्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सगळेच एका विशिष्ट दिशेनेच वायू उत्सर्जित करीत आहेत. तारे कसे बनतात हे समजून घेण्यासाठी हा शोध महत्त्वपूर्ण ठरेल, असे संशोधकांना वाटते.
हे सर्व तारे ज्या ठिकाणी जन्मले आहेत त्या ‘नर्सरी’त एकाच दिशेने अतिशय वेगाने वायूंचे उत्सर्जन करीत आहेत. त्याचे नेमके कारण संशोधकांना समजलेले नाही.

माहिती ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध

नवजात तारे वायूंचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करतात हे आधीपासूनच संशोधकांना ठावूक होते. ‘प्रोटोस्टेलर आऊटफ्लोज’ या अनेक वर्षांपासून अभ्यासल्या गेलेल्या विषयाचे हे प्रत्यक्ष द़ृश्य आता दिसून आले. असे तारे ज्या वायूंच्या ढगाने वेढलेले असतात त्यामध्ये हे वायू उत्सर्जित होतात व हा वायू अशा वायूच्या ढगांना धडकतो. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील मुख्य संशोधक क्लॉस पोंटोपिडन यांनी सांगितले की, ढगच एकमेकांना धडकून तारे बनतात असे दीर्घकाळापासून मानले जात होते. तारे त्याच दिशेने फिरत असतात. मात्र, याबाबतचे प्रत्यक्ष प्रमाण दिसून आले नव्हते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT