वॉशिंग्टन ः जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने अंतराळातील एका विस्मयकारक ऑप्टिकल इल्युजनचा, ‘आईन्स्टाईन रिंग’चा प्रभावी फोटो टिपला आहे. हा अद्वितीय खगोलीय प्रकार दिसायला जणू एका डोळ्यासारखा वाटतो, पण प्रत्यक्षात हा दोन अतिदूरच्या आकाशगंगांचा विकृत स्वरूपात दिसणारा प्रतिमा प्रभाव आहे. हा नजारा हायड्रस तारकासमूहात दिसून आला आहे.
या आश्चर्यकारक द़ृश्याच्या मध्यभागी एक आकाशगंगा उजळून दिसते, तर तिच्या भोवती दिसणारा ताणलेला केशरी आणि निळसर भाग दुसर्या, अधिक दूरच्या आकाशगंगेच्या प्रकाशाचा आहे. हा प्रकाश गुरुत्वीय लेन्सिंगच्या प्रभावामुळे वाकलेला आहे आणि त्यामुळेच तो रिंगच्या आकारात दिसतो. गुरुत्वीय लेन्सिंग म्हणजे एका विशाल वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या मागे असलेल्या वस्तूंचा प्रकाश वाकणे आणि विकृत होणे. ही संकल्पना आल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांतावर आधारित आहे. हा सिद्धांत सांगतो की, कोणत्याही वस्तूचा मोठा द्रव्यभार अवकाश-काळ वाकवतो, ज्यामुळे प्रकाशही वाकलेल्या मार्गाने प्रवास करतो, जसे की एक बॉल वाकलेल्या पृष्ठभागावरून फिरतो. ‘हा प्रभाव स्थानिक स्तरावर दिसत नाही, परंतु अंतराळातील प्रचंड प्रमाणातील वस्तूंच्या गुरुत्वीय प्रभावामुळे तो स्पष्टपणे जाणवतो, असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या अधिकार्यांनी नमूद केले. हा अद्भुत फोटो जेम्स वेबच्या निअर-इन्फ— ारेड कॅमेर्याने कॅप्चर करण्यात आला, तसेच हबल स्पेस टेलिस्कोपच्या वाईड फिल्ड कॅमेरा-3 आणि अॅडव्हान्सड कॅमेरा फॉर सर्व्हेकडूनही डेटा संकलित करण्यात आला. हा फोटो युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडियन स्पेस एजन्सीने 27 मार्च रोजी ‘मार्च महिना विशेष’ म्हणून प्रसिद्ध केला.