Kulfi for Dogs | जयपूरमध्‍ये मिळते कुत्र्यांसाठी ‘कुल्फी’ 
विश्वसंचार

Kulfi for Dogs | जयपूरमध्‍ये मिळते कुत्र्यांसाठी ‘कुल्फी’

लोकांना खाण्यास बंदी; डॉग लव्हर्सचा उदंड प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

जयपूर : ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहराच्या रस्त्यांवर सध्या एका अनोख्या कुल्फीच्या गाड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जिथे सामान्यतः माणसांची गर्दी पाहायला मिळते, तिथे या ठेल्यावर मात्र चार पायांच्या ग्राहकांसाठी म्हणजेच कुत्र्यांसाठी खास रांग पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या अनोख्या उपक्रमाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जयपूरच्या एका मुख्य चौकात लागणाऱ्या 'श्रीराम कुल्फी' नावाच्या या ठेल्यावर मिळणारी कुल्फी केवळ आणि केवळ कुत्र्यांसाठी तयार केली जाते, ती मानवांसाठी नाही.

शुगर-फ्री कुल्फी

कुल्फी विक्रेत्याच्या माहितीनुसार, ही कुल्फी शुद्ध दूध आणि माव्यापासून तयार केली जाते. कुत्र्यांच्या आरोग्याला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी यात साखरेचा एकही कण टाकला जात नाही. जयपूर शहरात राहणारे कुत्रे प्रेमी (डॉग लव्हर्स) आपल्या महागड्या गाड्यांमधून येऊन पाळीव कुत्र्यांसाठी ही कुल्फी खरेदी करतात. इन्स्टाग्रामवर एका युजरने या कुल्‍फीच्‍या ठेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी स्वतःच्या ‘तारा’ नावाच्या श्‍वानाला ही कुल्फी भरवली. ताराने अवघ्या काही सेकंदांत ती कुल्‍फी फस्त केली. मुक्या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन असा अनोखा व्यवसाय सुरू करणाऱ्या या कुल्फी विक्रेत्याच्या कल्पकतेचे आणि प्राणिप्रेमाचे नेटिझन्सकडून भरभरून कौतुक केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT