विश्वसंचार

मित्राला महागडी गाडी देणे पडले भलतेच महागात!

Pudhari News

माद्रिद : एखाद्या मित्राने तातडीच्या कामासाठी आपले वाहन मागून नेणे हे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. मात्र, स्पेनमध्ये एका व्यक्‍तीला आपली दोन कोटी रुपयांची आलिशान कार मित्राला देणे चांगलेच महागात पडले. या मित्रवर्याने या गाडीची एका ठिकाणी ठोकर मारली आणि त्यामुळे स्थानिक भागात वीजपुरवठाही खंडित करावा लागला!

हरिकेन परफॉर्मेन्ट ही लॅम्बॉर्गिनी कंपनीची गाडी एका व्यक्‍तीने आपल्या मित्राला चालवण्यास दिली होती. ही हिरव्या रंगाची गाडी तब्बल 2 कोटी रुपयांची आहे. ही गाडी स्पेनमधील एका विद्युत पुरवठा करणार्‍या सबस्टेशनला धडकली. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता ही गाडी त्याच्या मालकीची नसल्याचे दिसून आले. गाडीच्या मालकाने आपल्या मित्राला ती दिल्याचे स्पष्ट झाले. अपघाताच्या ठिकाणावरून ही गाडी बाहेर काढण्यासाठी या परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित करावा लागला. या सर्व प्रकाराची झळ मूळ मालकाला बसली असून गाडी चालवणारा मित्र सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT