Chandrayaan 4 landing site | इस्रोने ‘चंद्रयान-4’च्या लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधली 
विश्वसंचार

Chandrayaan 4 landing site | इस्रोने ‘चंद्रयान-4’च्या लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधली

दक्षिण ध्रुवावर होणार स्वारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपल्या आगामी ‘चंद्रयान-4’ मोहिमेसाठी सज्ज होत असून, या ऐतिहासिक मोहिमेसाठी शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ एक सुरक्षित लँडिंग साईट शोधली आहे. या शोधामुळे भारताच्या आगामी महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेचा मार्ग मोकळा झाला आहे.

शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या ‘मॉन्स माऊटन’ (MM-4) या ठिकाणाची लँडिंगसाठी निवड केली आहे. हे ठिकाण निवडण्यामागची प्रमुख कारणे अशी : समतल पृष्ठभाग : मॉन्स माऊटन हा सुमारे 6,000 मीटर उंच डोंगर असला, तरी त्याचा वरचा पृष्ठभाग बराचसा समतल आहे, जो सुरक्षित लँडिंगसाठी अत्यंत योग्य आहे. सूर्यप्रकाश : या भागात दीर्घकाळ सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, ज्यामुळे लँडर आणि रोव्हरला सौरऊर्जेच्या माध्यमातून काम करणे सोपे होईल. पाण्याचे अस्तित्व : या क्षेत्रात ‘वॉटर आईस’ (गोठलेले पाणी) मिळण्याची दाट शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

विशेष म्हणजे, ही लँडिंग साईट शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोंचा वापर केला आहे. ऑर्बिटरवर असलेला कॅमेरा इतका शक्तिशाली आहे की, तो चंद्राच्या पृष्ठभागाचे 32 सेंटीमीटर प्रतिपिक्सेल रेझोल्युशनने स्पष्ट फोटो घेतो. या फोटोंच्या विश्लेषणामुळे चंद्रावरील खड्डे, उतार आणि जमिनीची पोत यांची अचूक माहिती मिळवणे शक्य झाले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, शास्त्रज्ञांनी हा अभ्यास नुकत्याच पार पडलेल्या ‘लूनर अँड प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्स’ ( LPSC 2026) मध्ये सादर केला. लँडिंग साईटबाबत सध्या हे ठिकाण निश्चित मानले जात असले, तरी मोहिमेच्या प्रत्यक्ष लाँचिंगच्या वेळी परिस्थितीनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल. चंद्रयान-4 ही मोहीम चंद्रावरील नमुने पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT