विश्वसंचार

शतकभरानंतर उघडले अमेरिकेतील बेट

Arun Patil

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कनजीक हडसन नदीजवळ बॅनरमॅन नावाचे एक छोटेसे बेट वसलेले आहे. मात्र, जवळपास 100 वर्षे या बेटाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अगदी अलीकडेच पर्यटकांसाठी हे अनोखे बेट खुले करण्यात आले. केवळ 6 मैल लांबीच्या या बेटाचा इतिहास यानिमित्ताने प्रकाशझोतात आला आहे.

सध्या या बेटावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, बॅनरमन कॅसल ट्रस्टकडे याची जबाबदारी सोपवली गेली आहे. 1900 मध्ये डेव्हिड बॅनरमॅन या शस्त्रांस्त्रांच्या व्यावसायिकाने आपल्या बंदूक-तोफांचा साठा ठेवण्यासाठी ही जागा निवडली होती. त्याने या बेटावर स्वत:साठी एक महलही बांधला.

1920 मध्ये या बेटावर स्फोट झाला आणि त्यानंतर या भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर हे बेट दुर्लक्षितच राहिले. पण, त्यानंतर या बेटावरील मूळ महल व जुन्या वास्तू जैसे थे ठेवत शक्य तितके नूतनीकरण केले गेले आणि आता ते पर्यटकांसाठी खुले केले गेले आहे.

SCROLL FOR NEXT