विश्वसंचार

Iran inflation crisis | इराणमध्ये एक अंडे सव्वा लाखाचे, एक लिटर दूध 8 लाखांचे!

पुढारी वृत्तसेवा

तेहरान ः जर तुम्ही किराणा सामानाच्या दुकानात गेलात व तिथे दुकानदाराने एका अंड्याचा भाव सव्वा लाख रुपये सांगितला आणि एक लिटर दूधाची किंमत 8 लाख रुपये सांगितली, तर तुमचे डोळे विस्फारतील! पण एप्रिल 2026 मधील हे इराणमधील कडवं सत्य आहे. इराणमध्ये एक डझन अंड्याचा दर 15 लाख रियाल पर्यंत जाऊन पोहोचलाय. एका अंड्यासाठी सव्वा लाख रियाल मोजणार्‍या या देशात एक लिटर दूधाची किंमत 8 लाख रियालपर्यंत आहे. एक किलो तांदळाचा भाव 32 लाख रियाल आहे. 1 किलो मटण एक कोटींना मिळतंय. एक डॉलर विकत घेण्यासाठी साडेसोळा लाख रियाल मोजावे लागत आहेत.

आज इराणचं चलन म्हणजे फक्त एक कागदी तुकडा आहे. त्यापेक्षा त्याला जास्त महत्व उरलेलं नाही. अधिकृत आकडे आणि फ्री मार्केटचं वास्तव यात जमीन-आसमानचं अंतर आहे. एप्रिल 2026 च्या सुरुवातीलाच एका अमेरिकी डॉलरची किंमत जवळपास 16,50,000 रियाल झालीय. भारतीय रुपयाशी तुलना केल्यास एक रुपयाचं मूल्य 17,200 इराणी रियाल होतात. इराणी चलनाचं मूल्य इतकं वेगाने घसरतय की, इराणच्या केंद्रीय बँकेने नुकतीच एक कोटी म्हणजे 10 मिलियन रियालची नोट जारी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 7 डॉलरच्या आसपास आहे. आर्थिक एक्सपर्टस्नुसार ज्यावेळी कुठल्या देशाच्या चलनात इतक्या वेगाने घसरण होते, तेव्हा ते फक्त पैशांचं नुकसान नसतं तर नागरिकांचं भविष्यदेखील धोक्यात येते.

रिचर्ड नेफ्यू यांनी त्यांच्या ‘द आर्ट ऑफ सँक्शन्स’ या पुस्तकात लिहिलय की, फक्त अर्थव्यवस्थेचं नुकसान करणं एवढाच प्रतिबंधांचा उद्देश मर्यादित नसतो, तर जनतेची मानसिक कणखरता मोडणं हासुद्धा हेतू असतो. इराणमध्ये अमेरिका हाच खेळ खेळत आहे. इराणने माघार घेतली नाही तर त्यांना स्टोन एज म्हणजे पाषाण युगात पाठवू अशी धमकीच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांनी इराणची वीज केंद्रे आणि पुलांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी दिलेली डेडलाईन संपायला अवघा एक तास उरला असताना या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाली. 2026 च्या सुरुवातीलाच ट्रम्प प्रशासनाने इराण विरुद्ध दबाव टाकण्याची खेळी सुरू केली. यावेळी त्यांच्या रडारवर फक्त तेल नव्हतं. इराणचा ड्रोन कार्यक्रम, मिसाईल सेक्टर आणि समुद्री शिपिंग नेटवर्कसुद्धा होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT