विश्वसंचार

गोरिलाच्या पिंजर्‍यात पडला चिमुरडा आणि…

Arun Patil

न्यू जर्सी : माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भावना असतात. त्यांनादेखील चांगल्या-वाईट गोष्टीची समज असते. मुके प्राणीही माणसांप्रमाणेच भावना व्यक्त करू शकत नसले तरी त्यांच्यातही भावना असतात. आता काळ बदलल्याने जंगलं नाहीशी झाले आहेत. काँक्रिटीकरणामुळं जंगलं नाहीशी होत आहेत. अशातच जर आपण प्राण्यांच्या अधिवाशात प्रवेश केल्यास ते आक्रमक होतात. मात्र, कधी कधी असंही होत की प्राणी मानवाची मदत करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात गोरिलाने 5 वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले होते.

एका इन्स्टाग्राम युजरने हा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलं आहे की, हा व्हिडीओ 31 ऑगस्ट 1986 सालातील आहे. न्यू जर्सी येथील झूमध्ये एक कुटुंब त्यांच्या 5 वर्षांच्या मुलासोबत फिरण्यासाठी आले होते. लेवान मेरिट असं या मुलाचं नाव होते. लेवान मेरिट बेशुद्ध होऊन गोरिलाच्या पिंजर्‍यात पडला. त्यानंतर पिंजर्‍यात असलेल्या गोरिलाने बेशुद्ध पडलेल्या या मुलाला हानी पोहोचवण्याऐवजी त्याचे रक्षण केले. पिंजर्‍यात असलेले इतर गोरिला आणि लेवानच्यामध्ये तो भिंत होऊन उभा ठाकला. तसंच, इतर गोरिलांना त्याला इजा करण्यापासून रोखले. त्यानंतर या चिमुकल्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवून प्रेमही दाखवले.

लेवान मेरिट पिंजर्‍यात असताना शुद्धीवर आला व त्याच्या बाजूलाच महाकाय गोरीला पाहून तो घाबरला. लेवान थरथर कापत असलेला या व्हिडीओत दिसत आहे. घाबरलेल्या लेवानला धीर देण्यासाठी गोरिलाना त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. गोरिलाचे हे वर्तन पाहून अनेकांना गहिवरून आले. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात हे यावरुनच दिसून येते. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तर, काही युजर्स मनाला भिडणार्‍या प्रतिक्रिया देत आहेत. इन्स्टाग्रामवर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, किंग काँग खरंच वास्तवात आहे!

SCROLL FOR NEXT