नवी दिल्ली : मेटा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नवीन सबस्क्रिप्शन मॉडेलची चाचणी करत आहे. याचे नाव ‘इन्स्टाग्राम प्लस’ आहे. ही मेटाची एक पेड सेवा असेल, ज्यामध्ये वापरकर्त्यांना काही नवीन आणि एक्सक्लुझिव्ह फीचर्स मिळतील, विशेषतः हे फीचर्स त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीशी संबंधित असतील. सध्या या नवीन सुविधेची चाचणी मेक्सिको, जपान आणि फिलिपाईन्ससारख्या देशांमध्ये सुरू आहे. हे लवकरच रोलआऊट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाव न दिसता स्टोरी पहा
आता कोणाचीही स्टोरी पाहिल्यावर तुमचे नाव समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही.
अधिक क्लोज फ्रेंडस् लिस्ट
आतापर्यंत फक्त एक क्लोज फ्रेंडस् लिस्ट तयार होते. आता वेगवेगळे ग्रुप तयार करून वेगवेगळ्या प्रेक्षकांना स्टोरी दाखवता येतील.
स्टोरी किती वेळा पाहिली गेली, हे देखील दिसेल
फक्त व्ह्यूजच नाही, तर एखाद्याने तुमची स्टोरी किती वेळा पुन्हा पाहिली, याचा डेटा देखील इन्स्टाग्राम तुम्हाला देईल.
स्टोरी 24 तासांपेक्षा जास्त काळ चालेल
सध्या स्टोरीचा कालावधी 24 तास आहे. आता स्टोरीची द़ृश्यमानता (व्हिजिबिलिटी) वाढवण्याचा पर्याय मिळेल, ज्यामुळे ती 24 तासांपेक्षा जास्त काळ सक्रिय राहू शकेल.
सुपरलाईक्स आणि सर्च फीचर
या नवीन अपडेटमुळे युजर्स स्टोरीवर अॅनिमेटेड सुपरलाईक्स पाठवू शकतील. व्ह्यूअर लिस्टमध्ये लोकांना शोधण्याचा (सर्च करण्याचा) पर्याय देखील मिळेल.
किती असू शकते किंमत?
हे फीचर बर्याच अंशी स्नॅपचॅटच्या स्नॅपचॅट प्लससारखे असू शकते, तथापि, कंपनीने अद्याप याची संपूर्ण माहिती किंवा जागतिक लाँचची तारीख अधिकृतपणे शेअर केलेली नाही. या फीचरची किंमत काही अंशी असू शकते.
मेक्सिको - सुमारे 200 रुपये प्रति महिना
जपान - सुमारे 188 रुपये प्रति महिना
फिलिपिन्स - सुमारे 100 रुपये प्रति महिना
भारतात जेव्हा लाँच होईल, तेव्हा सबस्क्रिप्शन याच श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.