विश्वसंचार

रस्ता मार्गाने दिल्ली ते थायलंडची वारी!

Arun Patil

बँकॉक : सोशल मीडियावर सध्या प्रवासाचे व्हीडीओ इतके व्हायरल होत आहेत की, एकाचे पाहून दुसराही ट्रॅव्हल ब्लॉगर होण्याची स्वप्ने पाहू लागतो. एका भारतीय तरुणाने मात्र आणखी कहर केला असून, हा तरुण रस्ते मार्गाने चक्क दिल्लीपासून थायलंडपर्यंत पोहोचला आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या दिशेने तो आगेकूच करणार आहे.

एकूण 150 दिवस कारने प्रवास करण्याचा या युवकाचा इरादा आहे. अनमोल जैस्वाल असे या तरुणाचे नाव असून तो ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर आहे. अनमोल दिल्लीपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आपल्या कारने प्रवासाला निघाला. सध्या तो चीनमार्गे थायलंडला पोहोचला आहे. अर्थात, कारने ही स्वारी करणे त्याच्यासाठी बरेच महागडे ठरते आहे. कारण, चीनमध्ये पोहोचता-पोहोचताच त्याचे 9 ते 10 लाख रुपये खर्च झाले होते.

या प्रवासात तो एकूण 11 देशांचा प्रवास करणार असून, यादरम्यान तो 20 हजार किलोमीटरपेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणार आहे. चीन, सिंगापूर, थायलंड, लाओसमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहोचणे हे त्याचे लक्ष्य आहे. या प्रवासासाठी 4 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल, अशी अपेक्षा असल्याचे त्याने यापूर्वी नमूद केले होते. या युवकाच्या या अभिनव प्रवासाचे व्हिडीओ व्हायरल होत असून, त्याला 1 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT