Planet discovery | भारतीय वैज्ञानिकांकडून विज्ञानाचे नियम धाब्यावर बसवणार्‍या ग्रहाचा शोध 
विश्वसंचार

Planet discovery | भारतीय वैज्ञानिकांकडून विज्ञानाचे नियम धाब्यावर बसवणार्‍या ग्रहाचा शोध

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अंतराळाच्या अथांग खोलीत अनेकदा अशा गोष्टी सापडतात ज्या मानवी मेंदूला चकित करतात. भारतीय वैज्ञानिकांच्या एका पथकाने अशाच एका अजब ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘फॉरबिडन’ म्हणजेच ‘वर्जित’ ग्रह म्हटले जात आहे. विज्ञानाच्या प्रचलित नियमांनुसार, या ग्रहाचे अस्तित्व तिथे असायलाच नको होते; मात्र तरीही हा ग्रह तिथे दिमाखात वावरत जुन्या सिद्धांतांना आव्हान देत आहे.

या ग्रहाचे नाव TOI-5205 b असे आहे. हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठ्या गुरू ग्रहाच्या आकाराचा आहे. मात्र, विशेष बाब त्याच्या आकारात नसून तो ज्या तार्‍याभोवती (सूर्याभोवती) फिरतो त्याबाबतीत आहे. सामान्यतः, गुरूसारखे मोठे ग्रह मोठ्या तार्‍यांभोवती तयार होतात. परंतु, हा ग्रह एका अत्यंत लहान आणि थंड तार्‍याच्या प्रदक्षिणा घालत आहे, ज्याला ‘रेड ड्वार्फ’ (M- dwarf) म्हटले जाते. हा तारा आपल्या सूर्यापेक्षा 40 टक्के लहान आहे. वैज्ञानिकांच्या मते, इतक्या लहान तार्‍याकडे इतका वायू आणि धूळ नसते की, तो गुरूसारखा अवाढव्य ग्रह निर्माण करू शकेल.

हे अगदी एखाद्या मुंगीने हत्तीला जन्म देण्यासारखेच आहे! या शोधामध्ये भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. बर्मिंगहॅम विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्रज्ञ अंजली पिएट्टे आणि आंतरराष्ट्रीय संघात सामील असलेले वैज्ञानिक शुभम कनोडिया यांनी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या डेटाचा वापर करून या रहस्यावरून पडदा उचलला आहे. शुभम कनोडिया यांच्या मते, या ग्रहाच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण भरपूर आहे; परंतु ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे, जी एक दुर्मीळ घटना आहे. हा शोध प्रतिष्ठित ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT