Shroud of Turin DNA claim | ट्युरिनच्या कफनीत भारतीय डीएनएचा ठसा? 
विश्वसंचार

Shroud of Turin DNA claim | ट्युरिनच्या कफनीत भारतीय डीएनएचा ठसा?

पुढारी वृत्तसेवा

रोम : ख्रिस्ती परंपरेत अत्यंत पवित्र मानली जाणारी श्रोड ऑ ट्युरीन ही कफनवस्त्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडील जीनोमिक संशोधनानुसार, या कफनीवर भारतीय उपखंडाशी संबंधित डीएनएचे अंश आढळले आहेत, ज्यामुळे तिच्या इतिहासाविषयी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

संशोधकांच्या मते, कफनीवरील सुमारे 38.7 टक्के डीएनए ‘दूषितीकरण’ हे भारताशी संबंधित मातृवंशातून आलेले असल्याचे दिसते. हा डीएनए प्राचीन वस्त्रोद्योग आणि व्यापारातून कफनीपर्यंत पोहोचला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः इंडस व्हॅली परिसरातील उत्कृष्ट वस्त्रनिर्मिती आणि त्यांचा पश्चिम आशिया व युरोपशी असलेला व्यापार याचा या निष्कर्षाशी संबंध जोडला जातो.

4.4 मीटर लांबीचे हे लिनन कापड जेसस ख्रिस्त यांच्या क्रुसिफिक्शननंतर त्यांच्या देहावर गुंडाळले गेले होते, अशी श्रद्धा आहे. या कफनीवर एका नग्न पुरुषाचे अस्पष्ट चित्र दिसते, ज्यावर क्रुसिफिक्शनसद़ृश जखमांचे चिन्ह आढळतात. मात्र, तिच्या प्रामाणिकतेबाबत शतकानुशतके वाद सुरू आहेत.

या कफनीचा लेखी इतिहास 1354 मध्ये फ्रान्समधील लिरे गावात आढळतो आणि सध्या ती इटलीतील ट्युरिन शहरात जतन केली आहे. परंतु, भारतीय डीएनएचा संपर्क नेमका कधी झाला, हे संशोधन स्पष्ट करू शकलेले नाहीत. इ.स. 33 च्या सुमारास, 1354 पूर्वी किंवा त्यानंतर कधीही घडला असू शकतो.

या अभ्यासात असेही आढळले की, 55 टक्केपेक्षा अधिक डीएनए मध्यपूर्वेतील लोकांशी संबंधित आहे, तर 5 टक्केपेक्षा कमी युरोपियन वंशाशी जोडलेले आहे. तसेच विविध वनस्पती आणि प्राण्यांचे अंशही सापडले, ज्यात अमेरिकन उत्पत्तीच्या बटाटा व मका यांचाही समावेश आहे. इटालियन संशोधक जियानी बर्कासिया यांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासामुळे कफनीच्या इतिहासात अनेक स्तरांवरील मानवी संपर्काचे पुरावे समोर आले आहेत. तरीही, या कफनीचा थेट संबंध येशू ख्रिस्तांशी होता का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT