आनंदी देशांच्या यादीत भारत 118 व्या स्थानावर! 
विश्वसंचार

आनंदी देशांच्या यादीत भारत 118 व्या स्थानावर!

World Happiness Report : जागतिक आनंद अहवालातून माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः पाश्चात्त्यांनी केलेल्या अनेक पाहण्या या पक्षपाती व पूर्वग्रहदूषित असतात असा अनेक वेळा अनुभव आलेला आहे. आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबिइंग रिसर्च सेंटरने 20 मार्च 2025 रोजी ‘जागतिक आनंद अहवाल’ ( World Happiness Report) प्रसिद्ध केला. या अहवालात भारत 118 व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे जगभर भीक मागून जगत असलेल्या आणि महागाईने उच्चांक जिथे गाठला आहे त्या पाकिस्तानचे स्थान 109 वे आहे! फिनलँड यावर्षीही सर्वाधिक आनंदी देश ठरला आहे, तर डेन्मार्क आणि आईसलँड अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत.

कोस्टा रिका आणि मेक्सिको प्रथमच शीर्ष 10 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले, अनुक्रमे 6 व्या आणि 10व्या क्रमांकावर. भारताची सर्वात नीचांकी रँकिंग 2012 मध्ये 144 होती, तर 2022 मध्ये सर्वाधिक 94 व्या स्थानावर होता. नेपाळ (92) आणि चीन (68) हे भारताच्या पुढे आहेत. शेजारचा पाकिस्तान 109 व्या स्थानावर असून श्रीलंका (133) आणि बांगलादेश (134) भारताच्या मागे आहेत. या अहवालात 6 मुख्य घटक विचारात घेतले गेले.

सामाजिक समर्थन ः भारतात उच्च गुण मिळाले, कारण मोठे कुटुंब, सामुदायिक संस्कृती आणि लोकांमधील सहकार्य यामुळे सामाजिक आधार मजबूत आहे.

स्वातंत्र्याचा अभाव ः या घटकात भारताला सर्वात कमी गुण मिळाले. अहवालात असे नमूद केले आहे की, लोकांना त्यांच्या जीवनाविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किती आहे आणि त्या निर्णयांमुळे समाधान मिळते का, यावर भारत कमी पडतो. अफगाणिस्तान यादीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे, जिथे अनेक महिलांनी आपल्या जीवनातील वाढत्या अडचणींबद्दल सांगितले आहे. सिएरा लिओन आणि लेबनॉन हेही सर्वात तळाच्या देशांमध्ये आहेत. यादीत युरोपियन देशांनी आघाडी घेतली आहे, कारण तेथे सामाजिक सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि जीवनमान उंचावणारे घटक अधिक चांगले आहेत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT