File Photo
विश्वसंचार

देशातील पहिला ‘व्हर्टिकल लिफ्ट’ सागरी पूल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तामिळनाडूमधील समुद्रातील पांबन येथील ब्रिटिशकालीन पुलाची नव्याने निर्मिती केली आहे. या व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पुलाचा नवा अवतार आता प्रवाशांना पाहायला मिळणार आहे. याची हायड्रॉलिक लिफ्ट नव्याने बांधली आहे. पुलाचा मधला भाग वर उचलून घेण्याची (व्हर्टिकल लिफ्ट) रचना असलेला हा रेल्वेपूल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना आहे.

तामिळनाडू येथील मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटाला जोडणारा हा व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल 111 वर्षे जुना आहे. या पुलाची नवीन लिफ्ट बांधून पूर्ण झाल्यामुळे रामेश्वरम तीर्थक्षेत्राला भेट देणार्‍या भाविकांसह स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या पुलाशेजारीच नवा पूल उभारण्याचे नियोजन रेल्वेने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 मध्ये नव्या पांबन पुलाची पायाभरणी झाली होती.आधुनिक इंजिनिअरिंगचा आविष्कार असलेला नवा पूल 2,0 70 मीटर लांबीचा आहे. यासाठी 535 कोटी रुपये खर्च आला आहे. उंच जहाजांना पुलाखालून जाता यावे, यासाठी या आधुनिक धर्तीच्या व्हर्टिकल लिफ्ट पुलाची ब्रिटिशांनी निर्मिती केली होती. जुना पूल कमकुवत झाल्याने तो डिसेंबर 2022 मध्ये बंद केला होता. त्यामुळे रामेश्वरला जाण्यासाठी भाविकांना रस्ते मार्गाने जाण्याचा एकमेव पर्याय उरला होता. जुना पूल लिफ्ट करण्यासाठी 16 व्यक्तींची गरज लागत होती. या कामासाठी सुमारे अर्धा तास लागत होता.

मात्र, नव्या पुलात जहाजांना खालून जाता यावे, यासाठी मधला भाग वर उचलण्यासाठी अवघे साडेपाच मिनिटे लागणार आहेत. या कमी वेळेत 72 मीटर लांबीचा भाग (स्पॅन) खाली-वर करणे शक्य झाले आहे. हा मधला भाग रेल्वेरुळांपासून सुमारे 17 मीटरपर्यंत वर उचलता येणार आहे. या पांबन पुलात 48.3 मीटरचे एकूण 99 स्पॅन आणि 72.5 मीटरचा एक मोठा स्पॅनचा समावेश आहे. पुलावर 34 मीटर उंचीचा टॉवर आहे. ट्रॅकसह लिफ्ट स्पॅनचे एकूण वजन 1,470 मेट्रिक टन आहे. पुलाच्या व्हर्टिकल लिफ्ट स्पॅनचे वजन 660 मेट्रिक टन आहे. नवीन पुलावर आता दोन रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गाड्यांची वाहतूक सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT