नव्या वर्षात ध्यानाने वाढवा सकारात्मकता! Pudhari File Photo
विश्वसंचार

नव्या वर्षात ध्यानाने वाढवा सकारात्मकता!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला ज्या अनमोल देणग्या दिल्या त्यामध्ये ध्यानाचाही समावेश होतो. केवळ आध्यात्मिक उद्दिष्ट्य गाठणे इतकाच ध्यानाचा उपयोग नाही. मानसिक आरोग्य राखण्यासाठीही ध्यान म्हणजेच मेडिटेशन आवश्यक आहे. हे करण्यासाठी अनेक भिन्न तंत्रे आहेत. काहीजण विशिष्ट देवतेवर ध्यान करतात, तर काही विशिष्ट ध्वनीवर. आधुनिक जगात काहींना चॉकलेट मेडिटेशन म्हणजेच चॉकलेट चघळत त्याची चव व गंध याकडे लक्ष ठेवून अन्य विचारांना दूर करणेही आवडते. आध्यात्मिक लोक थेट आत्मतत्त्वावर ध्यान करतात; पण आजकाल बहुतेक लोक ध्यानासाठी संगीताची मदत घेत आहेत. गाणी ऐकत ध्यान केल्याने तणावापासून आराम मिळू शकतो. याशिवाय झोपेची गुणवत्ताही सुधारू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

ध्यान करताना संगीत ऐकण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया. हेल्थलाईनच्या बातमीनुसार, तणाव दूर करण्यासाठी संगीत ध्यान हा एक चांगला पर्याय आहे. वास्तविक ताण हा माणसाच्या मेंदूतील हार्मोनल बदलांचा परिणाम असतो. त्या संप्रेरकांमध्ये कॉर्टिसॉल, एंडोर्फिन, प्रोलॅक्टिन हे मुख्य आहेत. या बदलांमुळे व्यक्ती तणावग्रस्त बनते. अशा परिस्थितीत तुम्ही ध्यानासोबत संगीताचाही वापर करू शकता. असे केल्याने व्यक्तीच्या आत तणावाशी संबंधित हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. ध्यान करताना संगीत ऐकल्याने बौद्धिक क्षमता सुधारते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. असे मानले जाते की, जोपर्यंत व्यक्ती पूर्णपणे तल्लीन होत नाही, तोपर्यंत ध्यान यशस्वी मानले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही ध्यान करताना संगीत ऐकत असाल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे; मात्र ते नियमित करणे अत्यंत गरजेचे आहे. ध्यान करताना संगीत ऐकल्याने भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. किंबहुना अनेकवेळा आपण भावनिक द़ृष्ट्या अस्वस्थ होतो आणि मनात भावनिक गडबड चालू राहते. या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत ध्यानासोबत संगीत असणे हा एक उत्तम पर्याय आहे. संगीत तुम्हाला मानसिकद़ृष्ट्या निरोगी ठेवते आणि मेंदूच्या त्या भागांमधील रासायनिक चढउतार संतुलित करण्यासाठी कार्य करते. असे अनेक लोक आहेत, ज्यांना झोपेशी संबंधित समस्या आहेत. व्यक्ती मानसिकद़ृष्ट्या निरोगी नसल्यामुळे हे थेट घडते. जर एखाद्याच्या झोपेचा दर्जा चांगला नसेल, तर तो निद्रानाशाचाही बळी ठरू शकतो. ही समस्या टाळण्यासाठी ध्यानासोबत संगीत ऐकणे हा एक उत्तम पर्याय आहे. असे नियमित केल्याने तुम्ही शांत झोपू शकता. तन-मनाच्या आरोग्यासाठी आणि असीम शांती अनुभवण्यासाठी ध्यानाला पर्याय नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT