2025 हे वर्ष विज्ञानाच्या आणि विशेषतः खगोलशास्त्राच्या द़ृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरले आहे. या वर्षात मानवाने अंतराळातील अशा काही रहस्यांचा उलगडा केला आहे, ज्यांनी आपल्या विश्वाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोनच बदलून टाकला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपपासून ते जगभरातील वेधशाळांपर्यंत, शास्त्रज्ञांनी अचाट शोध लावले आहेत. या वर्षातील पाच महत्त्वाचे शोध खालीलप्रमाणे आहेत :
1. क्विपू : ब्रह्मांडातील सर्वात मोठी महासंरचना
यावर्षी अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स या शोधपत्रिकेत क्विपू नावाच्या महाकाय संरचनेच्या शोधाने खळबळ उडवून दिली. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी शोधलेली ही संरचना तब्बल 200 क्वाड्रिलियन सौर द्रव्यमानाची आहे. 428 मेगापार्सेक क्षेत्रात पसरलेल्या या रचनेतून प्रकाश पार व्हायलाही 13 दशलक्ष वर्षे लागतात.
2. अलकनंदा : आकाशगंगेची जुळी बहीण
जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने शास्त्रज्ञांनी अलकनंदा नावाच्या एका विशेष दीर्घिकेचा शोध लावला. ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेसारखीच दिसते. विशेष म्हणजे, बिग बँगनंतर अवघ्या 1.5 अब्ज वर्षांनी ही दीर्घिका इतक्या परिपक्व स्वरूपात कशी तयार झाली, याचे नवल शास्त्रज्ञांना वाटत आहे.
3. 3आय/अॅटलास : तिसरा आंतरतारकीय पाहुणा
2025 मध्ये 3आय/अॅटलास या धूमकेतूने खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. ओमुआमुआ आणि बोरिसोव्ह नंतर आपल्या सूर्यमालेत प्रवेश करणारा हा तिसरा इंटरस्टेलर (आंतरतारकीय) पदार्थ आहे. हा धूमकेतू इतर कुठल्यातरी तार्याच्या प्रणालीतून आपल्याकडे आला आहे.
4. धूमकेतू लेमनची परेड
या वर्षात आकाशप्रेमींना अनेक धूमकेतू पाहण्याची संधी मिळाली. यामध्ये लेमन आणि 3ख/रींश्ररी सारख्या धूमकेतूंनी रात्रीच्या आकाशात आपली चमक दाखवली. त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोलाची माहिती मिळाली आहे.
5. लघुग्रहांचे सावट आणि सुरक्षा
2025 मध्ये पृथ्वीच्या जवळून जाणार्या लघुग्रहांच्या वाढत्या संख्येमुळे शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, नवीन ट्रॅकिंग प्रणालीमुळे आपण अशा संभाव्य धोक्यांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यास अधिक सक्षम झालो आहोत.