विश्वसंचार

जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली नेब्युलाची प्रतिमा

Arun Patil

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने एका रिंग नेब्युलाची प्रतिमा आपल्या कॅमेर्‍यात टिपून घेतली आहे. एखाद्या चमकदार हिरवट, जांभळ्या डोळ्यासारखा दिसणारा हा नेब्युला आहे. या नेब्युलाचे नाव 'मेसिएर 57' (एम 57) असे आहे. पृथ्वीपासून 2200 प्रकाशवर्ष अंतरावर हा नेब्युला आहे.

लायरा तारकापुंजात हा नेब्युला आहे. स्वच्छ आकाश असताना हा नेब्युला त्याच्या डोनटसारख्या आकारात आणि धूळ व वायूच्या चमकदार सामग्रीमुळे हौशी खगोल निरीक्षकांनाही आपल्या दुर्बिणीद्वारे पाहता येऊ शकतो. वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील अ‍ॅस्ट्राफिजिस्ट जान कॅमी यांनी सांगितले की मी लहान असताना एका छोट्याशा दुर्बिणीद्वारे हा रिंग नेब्युला पाहिला होता.

आता हेच कॅमी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप रिंग नेब्युला इमेजिंग प्रोजेक्टचे महत्त्वाचे सदस्य आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणीनेही मी हा नेब्युला पाहीन याची मी कल्पनाही केलेली नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. 'नेब्युला' हे दीर्घकाळापूर्वी मृत्युमुखी पडलेल्या तार्‍याचे चमकदार अवशेष असतात.

SCROLL FOR NEXT