आईसलंडमधील 800 वर्षांपूर्वीचा शांत ज्वालामुखी सक्रिय झाला. Pudhari File Photo
विश्वसंचार

आईसलँडच्या खाली उकळत आहे पृथ्वी!

आईसलँडच्या बेटावरील ज्वालामुखी 800 वर्षानंतर सक्रीय

पुढारी वृत्तसेवा

लंडन : देशाचे नाव आहे ‘आईसलँड’. या बर्फाच्छादित थंड देशाच्या जमिनीखालील स्थिती मात्र वेगळीच आहे. या आईसलँडच्या खाली पृथ्वी जणू उकळत आहे. आईसलँडच्या रेक्जेन्स बेटावरील ज्वालामुखी सुमारे 800 वर्षे शांत राहिल्यानंतर आता अचानक सक्रिय झाले आहेत. 2021 नंतर तेथील ज्वालामुखींचा आठ वेळा उद्रेक झाला आहे. नव्या संशोधनात आढळले आहे की, ही ज्वालामुखींच्या उद्रेकांची मालिका इतक्या लवकर थांबणार नाही. आईसलँडमध्ये अनेक दशके पृथ्वीच्या पोटतील तप्त लाव्हा बाहेर येत राहील!

सहा देशांच्या संशोधकांच्या संयुक्त संशोधन

सहा देशांच्या संशोधकांच्या पथकाने याबाबत संयुक्त संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या ज्वालामुखीय हालचालींमागे मॅग्माचा एक उथळ सेतू असून, तो केवळ दहा किलोमीटर रुंदीचा आहे. हा मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ नऊ ते बारा किलोमीटर खोलीवर आहे. संशोधकांना वाटते की, हा मॅग्मा रेक्जेन्स बेटावर अनेक दशके ज्वालामुखींचा उद्रेक सुरू ठेवू शकतो. या संशोधनाचे नेतृत्व स्वीडनच्या उप्साला युनिव्हर्सिटीतील जियोलॉजिस्ट व्हॅलेंटाईन ट्रोल यांनी केले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘टेरा नोवा’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रोल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ज्वालामुखी स्फोट आणि भूकंपाच्या ‘झुंडी’तून मिळालेल्या भूकंपीय लहरींच्या आकडेवारीचा संशोधनासाठी वापर केला. त्यांनी नैऋ त्य आईसलँडमधील रेक्जेनेस बेटाच्या पृष्ठभागाचे एक मानचित्रही बनवले. विशेष म्हणजे देशाची बहुतांश लोकसंख्या याच परिसरात राहते. मॅग्मा पुलाची ओळख झाल्यानंतर आता त्याचेही मॅपिंग केले जाऊ शकते. भविष्यात येथील लोकांना वारंवार स्थलांतरित व्हावे लागू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT