बीजिंग : चीनमध्ये कोरोनाने माजवलेल्या हाहाकाराचे वृत्त येत असतानाच चीनच्याच उत्तरेकडील हार्बिन शहरातील 'आईस अँड स्नो फेस्टिव्हल'चीही (Ice and Snow Festiva) छायाचित्रे समोर येऊ लागली आहेत. हार्बिनमध्ये बर्फाच्या कलाकृतींचे एक सुंदर शहरच निर्माण केलेले आहे. ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक तिथे येत आहेत.
हार्बिन शहरात गेल्या 38 वर्षांपासून अशा प्रकारचा उत्सव दरवर्षी हिवाळ्यात भरवला जातो. (Ice and Snow Festiva) त्यामध्ये बर्फाचे अनेक सुंदर महाल, भव्य कलाकृती बनवल्या जातात व त्यांचे प्रदर्शन केले जाते. (Ice and Snow Festiva) कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नव्हता. मात्र, चिनी सरकारने झीरो कोव्हिड पॉलिसीमध्ये सवलत दिल्यानंतर आता पुन्हा एकदा हा उत्सव भरला असून त्यामध्ये लोकही गर्दी करीत आहेत. या फेस्टिव्हलसाठी सुमारे 200 एकर परिसरात बर्फाची एक न्यारी नगरीच वसवलेली आहे. या बर्फाच्या शहरात कोरोनाला विसरून अनेक पर्यटक येत आहेत व मनसोक्त मौजमजा करीत आहेत.
याठिकाणी बर्फाच्या अनेक शिल्पकृती बनवलेल्या असून जगातील अनेक प्रसिद्ध इमारतींच्या प्रतिकृतीही बनवलेल्या आहेत. त्यासाठी सुमारे 35 लाख घन फूट बर्फ आणि सुमारे 17 लाख घन फूट हिम (मऊ, सफेद बर्फ) वापरण्यात आला आहे. चीनचा हा उत्तर भागातील परिसर जगातील सर्वात थंड क्षेत्रांपैकी एक आहे. अनेक वेळा तेथील पारा शुन्याखाली 35 अंशांपर्यंत घसरतो. मात्र, याच स्थितीचा येथील लोकांनी चांगला वापर करून हा उत्सव भरवण्यास सुरुवात केली व त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली.