पृथ्वीच्या पोटात अक्षय ऊर्जेचा खजिना Pudhari File Photo
विश्वसंचार

पृथ्वीच्या पोटात अक्षय ऊर्जेचा खजिना

हे भांडार आहे पृथ्वीच्या पोटातील हायड्रोजन वायूचे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, पृथ्वीच्या पोटात एक अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, जी संपूर्ण जगाला दोनशेपेक्षाही अधिक वर्षे वीज देऊ शकते. त्यांना या साधनसंपत्तीचे एक मोठे भूमिगत भांडार आढळून आले आहे, जे अक्षय ऊर्जेबाबतच्या आपल्या सर्व धारणा बदलून टाकू शकतात. हे भांडार आहे पृथ्वीच्या पोटातील हायड्रोजन वायूचे! अब्जावधी टन हायड्रोजन वायूचे भांडार पृथ्वीच्या पोटातील खडक आणि जलाशयांमध्ये लपलेले असू शकते.

‘द डायरी24’च्या रिपोर्टनुसार, या छुप्या भांडारामुळे अनेक शतके वीजपुरवठा केला जाऊ शकतो. अर्थात हा नैसर्गिक हायड्रोजन आहे, निळा किंवा हिरवा हायड्रोजन नाही, जो टिकवून ठेवणे कठीण असते. मात्र, असा नैसर्गिक हायड्रोजन बाहेर काढणे आणि त्याचा वैश्विक स्तरावर वापर करणे ही सहज साध्य बाब नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असणार्‍या अशा हायड्रोजनचा छोटासा हिस्साही दोनशे वर्षे जीवाश्म इंधनावरील निर्भरता कमी करू शकतो. नव्या संशोधनानुसार पृथ्वीच्या भूमिगत जलाशये आणि खडकांमध्ये 6.2 ट्रिलियन टन (5.6 ट्रिलियन मेट्रिक टन) हायड्रोजन आहे. अशा हायड्रोजन भांडारांचे स्थान अज्ञात आहे, मात्र ते जमिनीतील तेलाच्या प्रमाणापेक्षा सुमारे 26 पट अधिक आहे. नैसर्गिकरित्या आढळणारे हे हायड्रोजनचे भांडार वैश्विक ऊर्जेच्या प्रणालींना नवे रूप देऊ शकते. हरित ऊर्जेचा आधार मानल्या जाणार्‍या या वायूचे उत्पादन मुख्यत्वे ऊर्जा-गहन प्रक्रियांच्या माध्यमातून कृत्रिम पद्धतीने केले जात असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT