विश्वसंचार

शार्कपेक्षा माणूस ३०० पट अधिक धोकादायक

Shambhuraj Pachindre

लंडन : मनुष्य हा सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेला प्राणी आहे. मात्र, आपल्या बुद्धीचा तो कसा वापर करील हे सांगता येत नाही. निसर्गाने दिलेली ही देणगी तो अनेक वेळा अन्य प्राण्यांचे शोषण करण्यासाठीच वापरत असतो. त्यामुळे आता बि—टनमधील संशोधकांनी म्हटले आहे की माणूस हा शार्कसारख्या शिकारी जलचरापेक्षाही 300 पट अधिक धोकादायक आहे.

ब्रिटनमधील वॉलिंगफोर्ड ऑक्सफर्डशायरच्या सेंटर फॉर इकॉलॉजी अँड हायड्रोलॉजीच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. संशोधकांच्या मते, मानव कधी एक तृतियांश प्राण्यांचे अन्न म्हणून, कधी औषध म्हणून तर कधी पाळीव प्राणी म्हणून शोषण करतो. त्यामुळे जगभरातील अनेक प्राणी नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. मानवाची प्रवृत्ती ही त्यांना ग्रेट व्हाईट शार्कसारख्या आक्रमक शिकार्‍याच्या तुलनेत शेकडो पटींनी अधिक धोकादायक बनवते. ही प्रवृत्तीच निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी एक गंभीर इशारा आहे. संशोधनाशी संबंधित डॉ. रॉब कुक यांनी म्हटले आहे की संशोधनात जे आढळले ते अतिशय आश्चर्यकारक आहे. प्राण्यांचा वापर करण्यासाठी माणसाकडे अनेक युक्त्या आहेत. जगभर मानव-निसर्ग संबंध अधिक द़ृढ करण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT