सिडनी : ऑस्ट्रेलियन अभिनेता हग जॅकमन आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेबोरा ली फर्नेस यांचा घटस्फोट झाला, तर तो फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा डिव्होर्स ठरणार आहे. या दोघांमध्ये तब्बल 3,387 कोटींचे विभाजन होणार आहे.
जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर जॅकमन आणि डेबोरा यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2023 मध्येच हे दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतरीत्या विभक्त होण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर ऑस्ट्रेलियन अभिनेता हग जॅकमन आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेबोरा ली फर्नेस यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2023 मध्येच हे दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर आता त्यांनी विभक्त होण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, जॅकमन आणि डेबोरा यांनी त्यांच्या मालमत्तेच्या विभाजनाबाबत एक करार केला आहे, ज्यामध्ये तब्बल 387 दशलक्ष डॉलर (जवळपास 3387 कोटी रुपये) संपत्तीचा समावेश आहे. या दोघांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून त्यासाठी फक्त न्यायालयीन मंजुरीची आवश्यकता आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर डेबोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विश्जवासघाताच्या वेदनादायी प्रवासातून गेलेल्या त्या सर्वांबद्दल माझ्या मनात संवेदना आहेत. ही एक खोलवर झालेली जखम आहे, असे तिने म्हटले आहे. जॅकमन आणि डेबोरा यांना दोन मुलं आहेत. ऑस्कर आणि आवा अशी त्यांची नावं आहेत. जिच्यासोबत जॅकमनच्या अफेअरच्या चर्चा आहेत, त्या सटॉन फॉस्टरने ऑक्टोबर 2024 मध्ये पती टेड ग्रिफिनला घटस्फोट दिला आहे. या दोघांना एक बाळ आहे. टेड हा पटकथा लेखक आहे.