न्यूयॉर्क : मोबाईल फोन ही आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची वस्तू बनलेली आहे. केवळ संभाषणासाठीच नव्हे तर अन्यही अनेक कामांसाठी मोबाईलचा वापर होत असतो. शॉपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाईन पेमेंट करणे असो, प्रत्येक जण यासाठी मोबाईलचा वापर करतो. आज मोबाईलच्या 170 कंपन्या बाजारात आहेत आणि त्या 170 कंपन्यांचे लाखो मोबाईल आहे; पण तुम्हाला माहिती आहे का जगातला पहिला मोबाईल कोणत्या कंपनीचा होता? त्या मोबाईलची किंमत किती होती? अनेक लोकांना याची पुरेशी माहिती नाही. आज आम्ही, तुम्हाला सांगणार आहोत की जगातला पहिला मोबाईल कोणी बनवला आणि तो कोणत्या कंपनीने तयार केला. त्याची किंमत काय होती. विशेष म्हणजे हा पहिला मोबाईल फोन तब्बल दोन किलो वजनाचा होता!
हा फोन 'मोटोरोला' कंपनीने 1984 साली तयार बनवला होता. 'मोटोरोला'च्या या फोनचे नाव 'मोटोरोलाज डायना टॅक 6000 एक्स'
( Motorola' s DynaTAC 6000 X) असे होते. या फोनमध्ये 14 डिजिटच्या एलईडी डिस्प्लेसोबत प्रोग्रामिंगसाठी की-पॅड आणि कॉल अलर्ट किंवा लाईट फिचरसुद्धा होता न्यूयॉर्कमध्ये राहणार्या मार्टिन कुपर यांनी पहिला मोबाईल बनवला आणि त्यांनीच त्याच्या वापराला सुरुवात केली. त्यांनी पहिला कॉल स्वत:च्या टीमला केला. हा फोन बनवण्यासाठी तेव्हा तब्बल 8 कोटींचा खर्च आला होता. पहिला मोबाईल फोन 1973 साली बनवला. त्यानंतर 1983 साली तो मार्केटमध्ये आला. म्हणजे पहिला मोबाईल फोन सामान्यांना उपलब्ध होण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागली. या फोनची विक्री पहिल्यांदाच यूएस मार्केटमध्ये सुरू झाली. त्यावेळी या मोबाईलची किंमत 3,399 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 2,40,712 इतकी ठरविण्यात आली होती. मोटोररोला कंपनीचा हा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी 10 तासांचा वेळ लागायचा. विशेष इतका वेळ चार्जिंग करूनही मोबाईलची बॅटरी अवघी 30 मिनिटेच टिकायची! 1983 मध्ये आलेल्या पहिल्या मोबाईलनंतर या क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या. या फोनमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. पूर्वी केवळ श्रीमंतांकडे आढळणारे मोबाईल फोन आता गावाखेड्यातील गरिबातल्या गरीब लोकांच्या हाती पोहोचलेत. भारतात मोबाईल वापरणार्या ग्राहकांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे.