summer stomach care | उन्हाळ्यात पोटाची काळजी कशी घ्यावी? 
विश्वसंचार

summer stomach care | उन्हाळ्यात पोटाची काळजी कशी घ्यावी?

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याचा पारा जसा वाढतो, तशा आरोग्याच्या तक्रारीही वाढू लागतात. तुम्हालाही वारंवार पोटात दुखणे किंवा पेटके येण्याचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे तज्ज्ञ सांगतात. तीव्र उष्णता आणि शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यामुळे पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. वेळीच काळजी न घेतल्यास या समस्या गंभीर रूप धारण करू शकतात. भीषण उष्णतेमुळे शरीरातून घामाच्या रूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते. शरीरात पाण्याची पातळी खालावल्यास पोटातील हानिकारक बॅक्टेरियांना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीरात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. परिणामी, पोट आणि छातीत जळजळ होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि गॅस होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

खाण्यापिण्यात सतर्कता आवश्यक

तेलकट पदार्थांपासून लांब राहा : उन्हाळ्यात जास्त फॅटयुक्त आणि मसालेदार जेवण पचण्यास जड जाते, ज्यामुळे अपचन आणि जळजळ वाढते.

आईस्क्रीम आणि थंड पेये : अनेकदा थंड वाटते म्हणून आपण आईस्क्रीम किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेली पेये घेतो. मात्र, अति थंड तापमान व साखर यांचे मिश्रण पोटासाठी घातक ठरू शकते.

डेअरी प्रॉडक्ट्स : ज्यांना लॅक्टोजची समस्या आहे, त्यांना उन्हाळ्यात डेअरी उत्पादनांमुळे गॅस, पोटात पेटके येणे किंवा जुलाब होऊ शकतात.

पोटाच्या समस्यांपासून असा करा बचाव :

पाण्याचे प्रमाण वाढवा : किडनी किंवा पोटाचे विकार टाळण्यासाठी उन्हाळ्यात किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्या.

नैसर्गिक पेये : शरीरातील इलेक्ट्रोलाइटस् टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी किंवा ओआरएस (ORS) घ्या. शहाळ्याचे पाणी पोटातील पीएच (pH) पातळी संतुलित राखते.

थंड प्रकृतीचे पदार्थ : आहारात दही, ताक, रायता, लस्सी यांचा समावेश करा. हे पदार्थ पोटातील उष्णता शांत करतात.

बाहेरचे अन्न टाळा : उन्हाळ्यात ‘स्ट्रीट फूड’ खाणे टाळा. घरी बनवलेले ताजे, हलके आणि पचण्यास सोपे असेच अन्न खा.

’या’ गोष्टींपासून दूर राहा :

चहा आणि कॉफीचे अतिसेवन टाळा.

कार्बोनेटेड ड्रिंक्स (कोल्ड ड्रिंक्स), डबाबंद (प्रोसेस्ड) अन्न कमी करा.

अति मसालेदार, तळलेले आणि तिखट पदार्थ खाणे बंद करा.

पोटाची उष्णता वाढण्याची प्रमुख कारणे :

जेवणाच्या वेळा न पाळणे, रात्री उशिरा जेवणे, अतिप्रमाणात खाणे.

शरीरात कॅफीनचे प्रमाण वाढल्याने पोटाच्या आतील थराची

जळजळ होणे.

तणाव आणि चिंतेमुळे शरीरात अ‍ॅसिडची निर्मिती वाढते.

पुरेशी झोप न मिळाल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊन पोटातील उष्णता वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT