न्यूयॉर्क ः अंतराळ किती विशाल आहे, याची कल्पनाच थक्क करणारी आहे. आपल्या आकाशगंगेमध्येच सुमारे 100 अब्ज तारे आहेत आणि संपूर्ण ब—ह्मांडात ट्रिलियन्स गॅलेक्सी असू शकतात; पण या असंख्य तार्यांच्या भोवती किती ग्रह असतील, याचा विचार केलात का? आजपर्यंत खगोलशास्त्रज्ञांनी 5,885 बाह्यग्रह (exoplanets) शोधले आहेत, म्हणजे आपल्या सौरमालेबाहेरच्या ग्रह. यामध्ये आपल्या सौरमालेतील 8 ग्रह धरले, तर आपल्याला 5,893 ग्रहांची माहिती आहे आणि हे सगळे मिल्की वेमध्येच आहेत; पण हा आकडा वास्तविकतेच्या फक्त एका अत्यंत छोट्या भागाचे प्रतिनिधित्व करतो.
न्यूयॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये कार्यरत खगोलशास्त्रज्ञ मार्क पोपिनचॉक यांच्या मते, ‘प्रत्येक तार्यामागे किमान एक ग्रह असतो असे आपण गृहीत धरू शकतो.’ म्हणजे आपल्या आकाशगंगेतील 100 अब्ज तार्यांप्रमाणेच सुमारे 100 अब्ज ग्रह असण्याची शक्यता आहे. पोपिनचॉक यांच्या मते, ग्रह मोजणे म्हणजे इंटरनेटशिवाय शहरात किती लोक राहतात, हे शोधण्यासारखे आहे. प्रत्येक घरात किती लोक राहतात आणि एकूण घरांची संख्या यावरून आपण अंदाज बांधतो. खगोलशास्त्रज्ञसुद्धा असाच डेटा वापरून ग्रहांचा अंदाज लावतात. आजवर ग्रह शोधण्यासाठी केपलर स्पेस टेलिस्कोप वापरलेली ‘ट्रान्झिट मेथड’ आणि 51 झशसरीळ ल ग्रहाच्या शोधाला नोबेल पुरस्कार मिळवून देणारी ‘रेडियल वेलॉसिटी मेथड‘ या मुख्य पद्धती वापरल्या गेल्या. या दोन्हीत वैज्ञानिक थेट ग्रहाकडे पाहत नाहीत, तर त्या ग्रहाने आपल्या यजमान तार्यावर निर्माण केलेल्या सूक्ष्म परिणामांकडे पाहतात जसे की तार्याच्या प्रकाशात घसरण (ट्रांझिट) किंवा तार्याच्या हालचालीतील सूक्ष्म ‘डुलकं’ (गुरुत्वीय ओढीमुळे). आतापर्यंत शोधले गेलेले सगळे ग्रह आपल्या मिल्की वे मध्ये आहेत. ब—ह्मांडातील इतर गॅलेक्सीमधील ग्रह म्हणजे ‘एक्स्ट्रोप्लॅनेटस्‘ अजून निश्चितपणे शोधले गेलेले नाहीत. कारण, ते फारच दूर आहेत आणि दिसणे अत्यंत अवघड आहे. तरीही ‘मायक्रोलेन्सिंग‘ या पद्धतीने काही संभाव्य एक्स्ट्रोप्लॅनेटस्चा मागोवा लागलेला आहे.
कॅन्सस विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ योनी ब—ांडे यांच्या मते, जेव्हा एखादा तारा आपल्या मागील तार्याच्या प्रकाशाला गुरुत्वाच्या प्रभावाने वाकवतो, तेव्हा जर त्या यजमान तार्यासोबत ग्रह असेल, तर त्या प्रकाशात एक सूक्ष्म अतिरिक्त ‘ब्लिप‘ तयार होते. हीच युक्ती वापरून लांबच्या गॅलेक्सीमधले संभाव्य ग्रह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोपिनचॉक यांच्या अंदाजानुसार, ‘जर आपल्या आकाशगंगेमध्ये सुमारे 100 अब्ज ग्रह असतील आणि जर ब—ह्मांडात एक ट्रिलियन गॅलेक्सी असतील, तर त्या प्रमाणात संपूर्ण ब—ह्मांडात सुमारे 100 सेक्स्टिलियन ग्रह असावेत!‘ म्हणजेच 1 नंतर 23 शून्ये.